तीन वेगवेगळ्या कारवायांत लाखोंचा मुद्देमाल जप्त; चार आरोपींवर गुन्हे दाखल शिरूर | शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू व्यवसायाविरोधात शनिवारी (दि. १६) विशेष मोहीम राबवून पोलिसांनी साबळेवाडी, कवठे येमाई व मलठण येथे धडक कारवाया करत सव्वा लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली कारवाई टाकळी हाजी हद्दीतील साबळेवाडी परिसरातील घोडनदी पात्रालगतच्या काटवणात करण्यात आली. येथे सुरेश चोरे व संतोष मुंजाळ (रा. डोंगरगण, ता. शिरूर) हे गावठी हातभट्टीची दारू तयार करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी छापा टाकून गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन, तयार दारू, केमिकलयुक्त ताडी तसेच इतर साहित्य असा मोठ्या प्रमाणावर…
Author: Team Shirur Digital
शिरूर | दिघी येथील गोळीबार प्रकरणातील फरार आरोपींनी पोलिसांच्या पाठलागादरम्यान पोलिसांवरच गोळीबार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी सोनेसांगवी (ता. शिरूर) परिसरात घडली. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. मात्र, आरोपी दाट झाडी व उसाच्या शेतात पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून शोधमोहीम सुरू होती. मिळालेल्या माहितीनुसार, दिघी येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणातील दोन आरोपी रांजणगाव गणपती येथील शेळके वस्ती परिसरात असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांचे विशेष पथक आरोपींच्या मागावर होते. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी दुचाकीवरून (क्र.एमएच १२ डब्ल्यूजी ५१८५) सोनेसांगवीच्या दिशेने पळ काढला. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनीही वाहनातून त्यांचा पाठलाग सुरू…
शिरूर दि. १५ ( अरुणकुमार मोटे) २७ वी ऑल इंडिया कुमार सुरेंद्र सिंग राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा मध्ये शिरूर तालुक्यातील कळवंतवाडी गावच्या कु. समृद्धी अजय चव्हाण हिने नेत्रदीपक कामगिरी करत संपूर्ण तालुक्याचा अभिमान उंचावला आहे. देशभरातील अव्वल नेमबाजांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत १० मीटर पिप साईट एअर रायफल या प्रकारामध्ये समृद्धीने तब्बल ६१२.४ गुणांची दमदार नोंद करत आगामी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. ग्रामीण भागातून आलेल्या एका होतकरू खेळाडूने राष्ट्रीय स्तरावर अशी झेप घेतल्याने शिरूर तालुक्यात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील नेमबाजी क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी कुमार सुरेंद्र सिंग राष्ट्रीय…
शिरूर दि. १० ( अरुणकुमार मोटे) शिरूर शहरातील पत्रकार व पारनेर तालुक्यातील जातेगाव येथिल भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष यांचा सुपुत्र तथा विद्याधाम प्रशाला, शिरूर येथील विद्यार्थी प्रणव अर्जुन बढे याने इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये तब्बल 97.40 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याच्या या उज्वल यशामुळे शिरूर शहरासह परिसरात त्याचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. अत्यंत जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर प्रणवने हे यश मिळवले आहे. अभ्यासासोबतच वेळेचे योग्य नियोजन, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबीयांचा पाठिंबा यामुळे त्याला हे यश प्राप्त झाले. विद्यार्थीदशेत शांत, अभ्यासू आणि मेहनती स्वभावामुळे तो शाळेमध्ये नेहमीच शिक्षकांचा आवडता…
जांबूत दि. ०७ | (प्रफुल बोंबे) आपल्या परिसरात बिबट- मानव संघर्ष मोठा असून आपण स्वतःची सुरक्षितता राखून काम करणे गरजेचे आहे. वनविभागासोबत संवेदनशिलतेने काम करून आपला सजग निर्णय आपला जीव वाचवू शकतो तर जुन्नर वनविभागाच्या इतिहासात भूतो न भविष्यती शुट आउट ऑपरेशन हे पिंपरखेड (ता.शिरूर) येथूनच घडले यामुळेच तब्बल ४७ बिबट आपण जेरबंद करू शकलो; हे यश प्रशासनासह ग्रामस्थांचे आहे, असे मत जुन्नर वनविभागाच्या सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी व्यक्त केले. पिंपरखेड (ता.शिरूर) येथे नुकत्याच संपन्न झालेला मानव –वन्यप्राणी संघर्ष कार्यशाळा कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रसंगी वनविभागात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाकडून सुवर्ण पदक प्राप्त झाल्याबद्दल स्मिता राजहंस यांचा ग्रामस्थांच्या…
शिरूर दि.०६ ( अरुणकुमार मोटे) शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावात दिवसाढवळ्या घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.माजी पंचायत समिती सदस्य तथा वैद्यकीय व्यवसायिक डॉ. कल्पना सुभाष पोकळे यांच्या मालकीच्या ‘ओम श्री क्लिनीक’मध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश करून तब्बल २ लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींच्याच क्लिनीकमध्ये दिवसाढवळ्या चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संताप व्यक्त होत आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. २ मे २०२६ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५.३० या वेळेत कवठे येमाई येथील…
शिरूर दि. ०५ ( अरुणकुमार मोटे) शिरूर तालुक्यातील जांबूत ग्रामपंचायतीचे सरपंच दत्तात्रय जोरी यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर सोमवारी झालेल्या विशेष सभेत बहुमताने ठराव मंजूर झाल्याने गावाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.जांबुत ग्रामपंचायत स्थापनेपासून पहिल्यांदा अविश्वास ठराव झाल्याची घटना घडली आहे. ग्रामपंचायत कार्यालयात दि. ०४ रोजी सकाळी ११ वाजता ही विशेष सभा घेण्यात आली. सभेसाठी संबंधित अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य तसेच पदाधिकारी उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायतीचे सरपंच दत्तात्रय रामचंद्र जोरी यांच्या कारभाराबाबत काही सदस्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. विकासकामे, प्रशासकीय निर्णय प्रक्रिया, सदस्यांना विश्वासात न घेणे तसेच ग्रामपंचायतीच्या कामकाजातील काही मुद्द्यांवरून सदस्यांमध्ये मतभेद वाढले होते. याच पार्श्वभूमीवर सरपंचांविरोधात…
शिरूर, दि. ३० ( अरुणकुमार मोटे) : शिरूर येथील कामाठीपुरा परिसरातील आश्रमशाळेत सेंट्रिंगचे काम सुरू असताना मोबाईलवर व्हिडिओ काढल्याच्या कारणावरून कामगारांवर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. तसेच मध्यस्थीला आलेल्या महिलेवर मारहाण करून तिच्याशी लज्जास्पद वर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय पलटू निषाद (वय २३, रा. सध्या कामाठीपुरा, शिरूर) हे आश्रमशाळेत मजुरीचे काम करीत होते. मंगळवारी (दि. २९) रात्री आठच्या सुमारास आश्रमशाळेच्या गेटवर काही कामगारांना आरोपी भूषण अनिल मुत्याल हा मारहाण करत होता. ही घटना मोबाईलमध्ये चित्रित केल्याचा राग आल्याने भूषण मुत्याल याने…
शिरूर दि. ३० ( अरुणकुमार मोटे) कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर पत्नीनेच दोन अनोळखी इसमांना पतीवर हल्ला करण्यास प्रवृत्त केल्याची धक्कादायक घटना शिरूर शहरात घडली असून या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम वाल्मीक टोनगे (वय ३६, रा. कोहकडी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास शिरूर शहरातील श्री हाइट्स सोसायटीसमोर, शिरूर–रामलिंग रस्त्याच्या कडेला ही घटना घडली. फिर्यादी यांची पत्नी चित्रा विक्रम टोनगे (सध्या रा. फाकटे, ता. शिरूर) हिने “पोटगी संदर्भात चर्चा करू” असे…
शिरूर, दि. ३० ( अरुणकुमार मोटे) द्रुतगती चलन भरूनही महिनाभरात मोजणी होणे अपेक्षित असताना शिरूर तालुक्यात सहा-सहा महिने उलटूनही मोजणी होत नसल्याने शेतकऱ्यांचा संताप तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर थेट चंद्रशेखर बावनकुळे यांना सवाल उपस्थित करत स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. नियमानुसार द्रुतगती चलनाच्या प्रकरणात एका महिन्यात मोजणी पूर्ण होणे आवश्यक आहे, तर नियमित चलनासाठी तीन महिन्यांची मर्यादा आहे. मात्र शिरूर तालुक्यात वर्ष उलटूनही अनेक शेतकऱ्यांना मोजण्या झाल्या नसल्याची धक्कादायक स्थिती आहे. परिणामी शेतकऱ्यांना भुमी अभिलेख कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. शेतकऱ्यांचा थेट सवाल असा आहे की, “द्रुतगती चलन भरूनही काम वेळेत होत नसेल, तर…

