Author: Team Shirur Digital

पिंपरखेड |  (प्रफुल्ल बोंबे )  शिरूर तालुक्यातील महत्त्वाच्या जांबुत ग्रामपंचायतीत राजकीय घडामोडींना वेग आला असून विद्यमान सरपंच दत्तात्रय रामचंद्र जोरी यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीतील एकूण आठ सदस्यांनी तहसीलदारांकडे अधिकृत अर्ज सादर केल्याने गावातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जांबुत ग्रामपंचायतीची निवडणूक सन २०२२ मध्ये पार पडली होती. त्यानंतर ३० ऑगस्ट २०२२ पासून दत्तात्रय जोरी हे सरपंचपदी कार्यरत आहेत. मात्र, अलीकडील काळात ग्रामपंचायतीतील काही सदस्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. सदस्यांनी सादर केलेल्या अर्जात सरपंच जोरी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून, सदस्यांवर विश्वास न ठेवणे, मनमानी पद्धतीने कारभार करणे तसेच गावाच्या विकासकामांकडे…

Read More

रांजणगाव गणपती : (साहेबराव लोखंडे) रांजणगाव गणपती परिसरात वाढत्या वाहनांच्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काळ्या काचा लावलेली तसेच बिगर नंबर प्लेट असलेल्या वाहनांविरोधात धडक मोहीम राबवली. या कारवाईत एकूण २८ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून ४५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सदर मोहीम ही परिसरात संशयास्पद हालचाली रोखण्यासाठी राबविण्यात आली. अशा प्रकारची वाहने अवैध धंदे किंवा इतर अनैतिक कृत्यांसाठी वापरली जात असण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी ही कडक कारवाई केली असल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, मारुती पासलकर, अविनाश थोरात, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, रमेश शिंदे…

Read More

शिरूर | (अरुणकुमार मोटे) राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आता थेट बेमुदत बंदचे हत्यार उचलले आहे. महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईडस् अ‍ॅण्ड सीडस् डिलर्स असोसिएशन (माफदा) यांच्या वतीने २७ एप्रिल २०२६ पासून राज्यभर विक्री केंद्रे बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात कृषी आयुक्तालय, पुणे येथील संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले असून, मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. संघटनेचे अध्यक्ष विनोद तराळ पाटील आणि महासचिव विपीन कासलीवाल यांनी सांगितले की, बियाणे, खते आणि किटकनाशक विक्री व्यवसायाशी निगडीत अनेक प्रश्न गेल्या चार ते पाच वर्षांपासून प्रलंबित आहेत. शासनाकडे सातत्याने पाठपुरावा…

Read More

शिरूर दि. १८ (अरुणकुमार मोटे ) शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील अनधिकृत उत्खनन प्रकरण उघडकीस आणण्यात RTI तथा व्हिसल ब्लोअर कार्यकर्ते अशोक भोरडे यांची महत्त्वाची भूमिका ठरली असून, त्यांच्या पाठपुराव्यामुळे संबंधित कंपनीवर प्रशासनाने मोठी कारवाई करत 43 लाख 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कारेगाव (ता. शिरूर, जि. पुणे) येथील प्लॉट क्रमांक 15 वर कार्यरत असलेल्या ओहासंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीविरुद्ध अनधिकृत उत्खननाबाबत 30 जुलै 2025 रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. तसेच 15 ऑगस्ट 2025 रोजी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याबाबतही निवेदन देण्यात आले होते. या तक्रारीच्या अनुषंगाने मंडळ अधिकारी शिरूर यांनी 11 ऑगस्ट 2025 रोजी…

Read More

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू शिरूर दि.१७ ( अरुणकुमार मोटे) शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या गंभीर परिस्थितीकडे शासन व पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जयहिंद सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश वाळुंज यांनी बेमुदत सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. बुधवार (ता. १५) पासून तहसीलदार कार्यालयासमोर सुरू झालेल्या या आंदोलनामुळे शहरासह तालुक्यात चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. या आंदोलनाचा तिसरा दिवस सुरू आहे. शहरात एमडी (मेफेड्रोन) सारख्या घातक अमली पदार्थांचा वाढता विळखा तरुणाईला ग्रासत असून, हातभट्टी दारूचे वाढते प्रमाण, अवैध धंदे, जुगार, मटका, चोरीच्या घटना, दादागिरी व भाईगिरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे…

Read More

शिरूर, ता. १४ (अरूणकुमार मोटे) : महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने राज्यभर राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’च्या धर्तीवर मलठण (ता. शिरूर) महसूल मंडळांतर्गत कवठे येमाई येथे शुक्रवारी (दि. १७) भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अष्टविनायक महामार्गावरील माहेश्वरी गार्डन मंगल कार्यालय येथे होणाऱ्या या शिबिरामुळे ग्रामस्थांना विविध शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहे. मलठण मंडल अधिकारी विजय फलके यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध योजनांची माहिती घ्यावी व प्रत्यक्ष लाभ मिळवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिरात महसूल विभागाकडून सातबारा दुरुस्ती, शेतरस्ते, शिवपाणंद रस्ते, उत्पन्न व जात प्रमाणपत्रे,…

Read More

शिरूर दि. १४ : ( अरुणकुमार मोटे) कायद्याचे रक्षण करणाऱ्या शिरूर पोलीस ठाण्याच्या आवारातच दि. १३ च्या मध्यरात्री गोंधळ, दगडफेक आणि मारामारीचे थरारक चित्र घडले यामुळे शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलीस स्टेशनच्या आवारातच दोन गट आमनेसामने येत एकमेकांवर हल्ले करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, यामुळे कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच ठाणे अमंलदार कक्षातीत काही वस्तुंची तोडफोड झाल्याची माहीती सुत्रांनी दिली आहे. शिरूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, दि.१३ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान शिरूर पोलीस स्टेशनच्या आवारात आणि पुणे अहिल्यानगर महामार्गावरील पंचायत समिती कार्यालयासमोर हा संपूर्ण प्रकार घडला. सुरुवातीला तक्रार नोंदविण्यासाठी आलेल्या दोन्ही गटांमध्ये वादावादी…

Read More

शिरूर, ता. ७ ( अरुणकुमार मोटे )  आई ही मायेचा सागर मानली जाते; मात्र शिरूर तालुक्यातील भांबर्डे येथे घडलेल्या एका अमानुष घटनेने या नात्यालाच काळिमा फासला आहे. अवघ्या अकरा महिन्यांच्या निष्पाप बाळाचा खून स्वतःच्या आईनेच केल्याचे उघड झाल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. सतत रडत असल्याच्या कारणावरून व दुसरे लग्न करण्यासाठी मुलाचा अडथळा निर्माण होत असल्याने आईनेच आपल्या चिमुकल्याचा जीव घेतल्याची कबुली पोलिस तपासात समोर आली असून, या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. यश रवींद्र पवार असे मृत बालकाचे नाव आहे. या प्रकरणी वडील रवींद्र अशोक पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आई पूजा रवींद्र पवार हिला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी (ता.…

Read More

टाकळी हाजी | प्रतिनिधी  शिरूर तालुक्यातील माळवाडी येथील भैरवनाथवाडी येथे भैरवनाथ यात्रा उत्सव बुधवारी (दि.१) मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.सकाळी अभिषेक, हळद समारंभ, मांडव डहाळे, होमहवन व काठी उभारण्याचे धार्मिक विधी पार पडले. सायंकाळी काठी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत उत्सवाला रंगत आणली. रात्री हभप गणेश महाराज वाघमारे यांचे कीर्तन झाले. कीर्तनात त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या विचारांवर प्रकाश टाकत, समाजात एकोपा व समतेचा संदेश दिला. संतांनी कधीही जातपात मानली नाही. आज प्रत्येक समाजाच्या घरात ज्ञानेश्वर महाराजांची पूजा होते,असे सांगत त्यांनी भक्तीचा खरा अर्थ स्पष्ट केला. सज्जनांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचेही…

Read More

टाकळी हाजी : प्रतिनिधी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत टाकळी हाजी ( ता.शिरूर) येथील थोरात परिवारातील सून श्रद्धा अक्षय थोरात यांची मंडळ कृषि अधिकारी पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण पार्श्वभूमीतून येत श्रद्धा यांनी जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळवले. विवाहानंतर अनेकदा मुलींच्या शिक्षणात खंड पडतो; मात्र थोरात कुटुंबाने याला अपवाद ठरवत श्रद्धा यांना पूर्ण पाठबळ दिले. शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्यांनी घरगुती जबाबदाऱ्या सांभाळत त्यांच्या अभ्यासात कोणताही अडथळा येऊ दिला नाही. श्रद्धा थोरात यांच्या यशामुळे टाकळी हाजी परिसरातील मुलींना स्पर्धा परीक्षांकडे वळण्याची प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या…

Read More