Author: Team Shirur Digital

कान्हूर मेसाई, ( ता. ११) |  सुनिल जिते शिरूर तालुक्यातील पश्चिम पट्यात असलेल्या मिडगुलवाडी परिसरात कवठे येमाई घाटात दुचाकीवरून घरी परतणाऱ्या तरुणावर बिबट्याने अचानक झेप घेतल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. १०) सायंकाळी घडली. या हल्ल्यात कृष्णा बबन जाधव (वय ३०, रा. मिडगुलवाडी) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. कृष्णा जाधव हा युवक कवठे येमाई येथून मिडगुलवाडीकडे दुचाकीवरून जात असताना सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास घाटातील चढावर रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने थेट त्याच्यावर झेप घेत हल्ला केला. बिबट्याने त्याच्या मान, गळा व हातावर पंजे मारत गंभीर जखमा केल्या. मात्र, जाधव याने प्रसंगावधान राखत शर्थीचा प्रतिकार करत बिबट्याचा हल्ला परतवून…

Read More

पिंपरखेड | (प्रफुल्ल बोंबे) दि. ११ जिल्हा परिषद पुणे अंतर्गत शिक्षण विभाग, पुणे जिल्हा मुख्याध्यापक व विज्ञान संघ तसेच जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल, वाघोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन वाघोली (पुणे) येथे उत्साहात पार पडले. या तीन दिवसीय विज्ञान प्रदर्शनात तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावलेल्या पिंपरखेड (ता. शिरूर) येथील श्रीदत्त विद्यालयाची इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी स्वराली नवनाथ दाभाडे हिने जिल्हास्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या यशामुळे तिची नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली असून परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.स्वराली दाभाडे हिने “उद्योन्मुख तंत्रज्ञान” या विषयांतर्गत वैद्यकीय…

Read More

शिरूर दि. ११ ( अरुणकुमार मोटे) शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बाबुरावनगर परिसरातील पायाभूत सुविधांची अक्षरशः वाताहत झाली असून रस्त्यांची अपूर्ण कामे, तुंबलेल्या गटार लाईन्स आणि विस्कळीत पाणीपुरवठा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. गंगा पेट्रोल पंपामागील टॉवर लाईन रस्त्याचे काम तीन महिन्यांपूर्वी मुरुमीकरण करून अर्धवट अवस्थेत सोडण्यात आले आहे. परिणामी या रस्त्यावरून खडी क्रेशरचे अवजड डंपर सातत्याने ये-जा करत असून संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून लहान मुले, वृद्ध आणि श्वसनाचे आजार असणाऱ्या रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे…

Read More