Author: Team Shirur Digital

रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्था यांचा वतीने आदर्श माता व आदर्श पत्रकार पुरस्काराने मान्यवरांचा गौरव शिरूर दि. १३ ( अरुणकुमार मोटे ) “राजमाता जिजाऊ या केवळ शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, तर स्वराज्याच्या पहिल्या गुरू होत्या. त्यांनी शिवरायांच्या मनात स्वधर्म, स्वराज्य आणि स्वाभिमानाची बीजे रोवली. तसेच स्वामी विवेकानंद यांनीही आदर्श जीवनमूल्यांची शिकवण समाजाला दिली. या दोघांचे ही कार्य महान असून विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणावे” असे आवाहन रामलिंग उन्नती बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणीताई कर्डीले यांनी केले. रांजणगांव येथील मंगलमूर्ती विद्याधाम शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी रामलिंग उन्नती बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या वतीने…

Read More

शिरूर दि. १३ ( अरुणकुमार मोटे) अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये सामाजिक कार्यात सातत्याने भरीव योगदान देणाऱ्या रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कार्डिले यांना ‘आदर्श समाजसेविका पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी सुप्रसिद्ध शिवशंभू व्याख्याते श्री. राकेश पिंजन सरकार यांनी “जिजाऊ तुम्ही होतात म्हणून…” या विषयावर अत्यंत प्रेरणादायी व्याख्यान सादर केले. त्यांच्या शब्दांतून राजमाता जिजाऊ साहेबांचे संस्कार, राष्ट्रनिर्मितीतील योगदान आणि मातृत्वाचे महान कार्य प्रभावीपणे उलगडले गेले. उपस्थित श्रोते भारावून गेले होते. कार्यक्रमात आदर्श…

Read More

शिरूर दि. १२ ( अरुणकुमार मोटे) । शिरूर तालुक्यातील कवठे यमाई पंचायत समिती गण हा महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असून २०२६ मध्ये होणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी आपला अधिकृत उमेदवार जाहीर केला असला, तरी इतर कोणत्याही राजकीय पक्षांकडून अद्याप उमेदवारीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे राजकीय वातावरणात उत्सुकता आणि संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, सविंदणे गावच्या विद्यमान सरपंच मनीषाताई दत्तात्रय नरवडे यांनी कवठे यमाई पंचायत समिती गणातून निवडणूक लढवावी, अशी जोरदार आणि सर्वपक्षीय मागणी ग्रामस्थांकडून पुढे येत आहे. विशेष म्हणजे ही मागणी कोणत्याही एका पक्षापुरती मर्यादित न राहता…

Read More

डांगे यांच्या पक्षांतराचा स्फोट; राष्ट्रवादीत खळबळ, वळसे गटात अस्वस्थता शिरूर : (अरुणकुमार मोटे) |  कवठे यमाई (ता. शिरूर) येथील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे निष्ठावान कार्यकर्ते तसेच बेट भागातील प्रभावी राजकीय नेतृत्व बाळासाहेब डांगे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने बेट भागातील राजकीय समिकरणे हादरून गेली आहेत. या पक्षांतरामुळे बेट भागात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले असून, त्याचे पडसाद येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये उमटणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. डांगे हे केवळ कार्यकर्ते नसून, गेली अनेक वर्षे संघटन बांधणी, कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी करणे आणि निवडणुकांमध्ये निर्णायक भूमिका बजावणारे नेतृत्व…

Read More

मराठी माध्यमाची सजग निवड करा : प्रा. डॉ. दीपक पवार यांचे आवाहन शिरूर (उद्धव जाधव) | मराठी अभ्यास केंद्र, कृषिलोक विकास संशोधन संस्था व शिरूर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सहयोगी शाळा व संस्थांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय मराठीप्रेमी पालक महासंमेलन – २०२६ चा समारोप रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. पालक, शिक्षक, भाषा अभ्यासक, साहित्यिक व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या लक्षणीय उपस्थितीमुळे संमेलनाला विचारमंथनाचे व्यापक स्वरूप प्राप्त झाले. संमेलनाचे उद्घाटन दत्तात्रय वारे गुरुजी यांच्या हस्ते झाले. मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष प्रा. डॉ. दीपक पवार यांनी संमेलनाची भूमिका मांडताना सांगितले की, मराठी शाळा आणि मराठी भाषा केंद्रस्थानी ठेवून मराठी अभ्यास…

Read More

शिरूर दि. १२ | ( अरुणकुमार मोटे) शिरूर–मलठण रस्ता : सार्वजनिक बांधकाम विभागाचा बेजबाबदार कारभार उघड शिरूर–मलठण हा अत्यंत महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आज सार्वजनिक बांधकाम विभाग शिरूरच्या अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी नव्हे तर लाजिरवाणा अपयशाचा नमुना ठरला आहे. निकृष्ट दर्जाचे काम, वेळोवेळी पडणारे प्रचंड खड्डे, आणि केवळ वरवरची मलमपट्टी त्यामुळे या रस्त्याने प्रशासनाची पोलखोल केली आहे. सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे तब्बल तीन वेळा नवीन काम करण्यात आले. तरीही काही महिन्यांतच रस्त्यावर पुन्हा मोठमोठे खड्डे पडले. प्रशासनाला ते खड्डे तीन वेळा बुजवावे लागले — पण रस्त्याची अवस्था मात्र जैसे थेच राहिली आहे प्रश्न एकच पडतो मग अधिकारी नक्की करतात…

Read More

शिरूर, दि. १२ (अरुणकुमार मोटे)  कवठे येमाई (ता. शिरूर) येथील येमाई चौकाजवळील अष्टविनायक रस्त्यालगत रामदेव स्टील दुकानासमोर रस्त्याच्या कडेला असलेले ड्रेनेज गेल्या अनेक दिवसांपासून उघड्या अवस्थेत असून ते परिसरासाठी अक्षरशः ‘मृत्यूचा सापळा’ ठरत आहे. या उघड्या ड्रेनेजमध्ये दुचाकी व चारचाकी वाहने अडकण्याचे प्रकार वारंवार घडत असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार यांना याचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे चित्र दिसून येत आहे. या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच दुचाकीस्वार यांना या उघड्या ड्रेनेजमुळे जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात तर हा धोका…

Read More

अष्टविनायक रस्त्यावरील ‘मृत्यूचा सापळा’ कधी बुजणार? कवठे येमाईतील उघड्या ड्रेनेजमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूच शिरूर, दि. १२ (अरुणकुमार मोटे) — कवठे येमाई (ता. शिरूर) येथील येमाई चौकाजवळील अष्टविनायक रस्त्यालगत रामदेव स्टील दुकानासमोर रस्त्याच्या कडेला असलेले ड्रेनेज गेल्या अनेक दिवसांपासून उघड्या अवस्थेत असून ते परिसरासाठी अक्षरशः ‘मृत्यूचा सापळा’ ठरत आहे. या उघड्या ड्रेनेजमध्ये दुचाकी व चारचाकी वाहने अडकण्याचे प्रकार वारंवार घडत असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार यांना याचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे चित्र दिसून येत आहे. या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच दुचाकीस्वार यांना या उघड्या…

Read More

शिरूर, दि. ११ (अरुणकुमार मोटे)  टाकळी हाजी गटातील जिल्हा परिषद सदस्य पदासाठी इच्छुक असलेले बाळासाहेब डांगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने बेट भागातील आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचे राजकीय समीकरण पूर्णतः बदलले आहे. या प्रवेशामुळे निवडणूक अधिकच चुरशीची होणार असून ती तिरंगी की चौरंगी होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून बाळासाहेब डांगे हे विविध माध्यमांतून आपली दावेदारी ठामपणे मांडत होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र, याच दरम्यान राजेंद्र गावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचाराला वेग दिल्याने डांगे…

Read More

शिरूर, दि. ११ (अरुणकुमार मोटे) टाकळी हाजी गटातील जिल्हा परिषद सदस्य पदासाठी इच्छुक असलेले बाळासाहेब डांगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोडून बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने बेट भागातील आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचे राजकीय समीकरण पूर्णतः बदलले आहे. या प्रवेशामुळे निवडणूक अधिकच चुरशीची होणार असून ती तिरंगी की चौरंगी होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून बाळासाहेब डांगे हे विविध माध्यमांतून आपली दावेदारी ठामपणे मांडत होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र, याच दरम्यान राजेंद्र गावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचाराला वेग दिल्याने डांगे…

Read More