Author: Team Shirur Digital

शिरूरमध्ये वडिलोपार्जित जमीन लुबाडण्यासाठी बनावट दस्तऐवजांचा मोठा कट उघड शिरूर दि. १८ ( अरुणकुमार मोटे) शिरूर तालुक्यातील पारोडी येथील वडिलोपार्जित शेतजमीन बळकावण्यासाठी तब्बल सहा दशकांपूर्वीच्या एकत्रिकरण नोंदींमध्ये छेडछाड करून बनावट जबाब, खोट्या सह्या व शिक्के तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात विविध कलमा अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात एकूण १३ जण आरोपी आहेत. विशेष म्हणजे या कथित कटात येळे कुटुंबातील सदस्यांसह उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय, शिरूर येथील कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचा आरोप असल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील फिर्यादी पोपट गंगाराम येळे (वय ४८, रा. पारोडी, ता. शिरूर) यांनी…

Read More

203 किलो 600 ग्रॅम गांजा मिश्रित ‘बंटा’ गोळ्या हस्तगत; 20 वर्षीय तरुण अटकेत शिरूर | रांजणगाव एमआयडीसी परिसरात गांजा मिश्रित गुंगीकारक ‘बंटा’ नावाच्या अमली गोळ्यांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या तरुणावर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 203 किलो 600 ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, एकूण 57 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या नशामुक्त भारत अभियानाच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून अमली पदार्थ व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंग गिल यांच्या आदेशानुसार अवैध व्यवसायांविरोधात कठोर कारवाई सुरू असून, त्याचाच भाग म्हणून…

Read More

जिल्हा परिषदेसाठी ३७, पंचायत समितीसाठी १२० अर्जांची विक्री शिरूर, दि. १७ (अरुणकुमार मोटे)  शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद सात गट व पंचायत समितीच्या चौदा गणांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया शिरूर तहसील कार्यालयात सुरू झाली आहे. हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जात असून निवडणूक काळात उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी व सहाय्यक निवडणूक अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांनी केले आहे. जिल्हा परिषद सात गटांसाठी आतापर्यंत ३७ उमेदवारी अर्जांची, तर पंचायत समितीच्या चौदा गणांसाठी १२० अर्जांची विक्री झाली आहे. मात्र, अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही, अशी माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली. उमेदवारी अर्ज…

Read More

शिरूर दि. १७ ( अरुणकुमार मोटे) | शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे सामायिक शेतजमिनीच्या खाजगी मोजणीवरून काका–पुतण्यात वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर जालिंदर इचके (वय ६५, व्यवसाय शेती, रा. कवठे यमाई) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, शुक्रवार दि. १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास कवठे येमाई गावच्या हद्दीतील सामायिक शेतजमीन गट क्रमांक ९९९ ची खाजगी मोजणी सुरू असताना हा प्रकार घडला. खाजगी मोजणीस पुतण्या वसंत कारभारी इचके…

Read More

शिरूर तालुक्यात खळबळ ; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई शिरूर दि. १७ ( अरुणकुमार मोटे) | शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा सजातील ग्राम महसूल अधिकारी(तलाठी ) प्रमीला नागेश वानखेडे (वय ४४ )यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केल्याने शिरूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. शिरूर पोलीस स्टेशन येथे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. एका तक्रारदाराच्या वडीलोपार्जित जमिनीचा पंचनामा आपल्या बाजूने करून देण्यासाठी तसेच पुढील कामात मदत करण्याच्या बदल्यात आरोपी लोकसेविका प्रमीला वानखेडे यांनी सुरुवातीला १० हजारांची लाच मागितल्याचे तक्रारीत नमूद आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे…

Read More

शिरूर | बापू जाधव कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिक सेवा आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर पोलीस खात्यात आपला वेगळा ठसा उमटविणारे विकास दत्तात्रय कुंभार यांना पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदोन्नती मिळाली आहे. ते सध्या शिक्रापूर पोलीस ठाणे येथे कार्यरत असून तेथे आनंदाचे वातावरण पसरले आहे. विकास कुंभार यांनी दि. २३ मे १९९५ रोजी पुणे ग्रामीण पोलीस दलात सेवेत प्रवेश केला. १९९९ साली शिक्रापूर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून त्यांनी आपली जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर २००९ ते २०१५ या कालावधीत शिरूर पोलीस ठाण्यात तर २०१५ ते २०२१ दरम्यान लोणीकंद पोलीस ठाण्यात त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली. २०२१ पासून ते पुन्हा शिक्रापूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. सेवेच्या प्रदीर्घ काळात…

Read More

पारनेर तालुक्यात सर्वोच्च यश; १६९ पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण पारनेर | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ अंतर्गत शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा डिसेंबर २०२५ मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात शालेय स्तरावर घेण्यात आली. या परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, पारनेर या विद्यालयाने १०० टक्के निकालाची उज्वल परंपरा कायम राखत पारनेर तालुक्यात सर्वोच्च निकालाची कामगिरी केली आहे. या परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण १६९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ४७ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी (A ग्रेड), ३७ विद्यार्थ्यांनी B ग्रेड, तर ७९ विद्यार्थ्यांनी C ग्रेड प्राप्त करून यश संपादन केले. या उल्लेखनीय यशामागे विद्यालयाचे कला विभागप्रमुख कलाशिक्षक श्री.…

Read More

शिरूर दि. १७ (अरुणकुमार मोटे ) : दोन दिवसांपूर्वी “शिरूर डिजिटल‌ डॉट कॉम ने” ‘शिरुरच्या बाबुरावनगर परिसरात पायाभूत सुविधांचा ग्रामपंचायतीकडून बोजवारा’ या सदराखाली शिवसाई मंगल कार्यालयाजवळील ड्रेनेज तुंबल्याची बातमी केली होती. आठ दिवसापासून रखडलेल्या या समस्येचे निराकरण झाले. परंतु दुसरीकडे डेक्कन शाळेसमोरील रस्त्यावर असलेल्या चेंबरमधून दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे. हा रस्ता सतत वर्दळीचा असून डेक्कन शाळेतील विद्यार्थी आणि पालक या रस्त्याने ये-जा करत असतात. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार गेल्या दोन महिन्यात तीन वेळेस हे ड्रेनेज तुंबले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाला कळवल्यानंतर दोन-चार दिवसाच्या पाठपुराव्यानंतर ड्रेनेजची काम करणे अपेक्षित होते. परंतु आठ दिवसांनी पुन्हा “जैसे थे” परिस्थिती आहे. हे रस्त्यावरील ड्रेनेज तुंबल्यामुळे परिसरातील इमारतींच्या…

Read More

शिरूर दि. १७ (अरुणकुमार मोटे ) दोन दिवसांपूर्वी शिरूर डिजिटल. कॉम ने “शिरुरच्या बाबुरावनगरात पायाभूत सुविधांचा ग्रामपंचायतीकडून बोजवारा” या सदराखाली शिवसाई मंगल कार्यालयाजवळील ड्रेनेज तुंबल्याची बातमी केली होती. आठ दिवसापासून रखडलेल्या या समस्येचे निराकरण झाले. परंतु दुसरीकडे डेक्कन शाळेसमोरील रस्त्यावर असलेल्या चेंबरमधून दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे. हा रस्ता सतत वर्दळीचा असून डेक्कन शाळेतील विद्यार्थी आणि पालक या रस्त्याने ये-जा करत असतात. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार गेल्या दोन महिन्यात तीन वेळेस हे ड्रेनेज तुंबले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाला कळवल्यानंतर दोन-चार दिवसाच्या पाठपुराव्यानंतर ड्रेनेज चोक काढण्याचे काम होते. परंतु आठ दिवसांनी पुन्हा “जैसे थे” परिस्थिती आहे. हे रस्त्यावरील ड्रेनेज तुंबल्यामुळे परिसरातील इमारतींच्या ड्रेनेजची घाण…

Read More

उपनगराध्यक्षपदी मितेश प्रदीप गादिया दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, भाजपला विरोधी बाकावर शिरूर दि. १६( अरुणकुमार मोटे) शिरूर नगरपरिषदेच्या राजकारणात मोठी आणि अनपेक्षित उलथापालथ पाहायला मिळाली. निवडणुकीदरम्यान एकमेकांविरोधात दंड थोपटलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अखेर उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकत्र आले आणि भाजपच्या गणितांना धक्का दिला.उपनगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे मितेश प्रदीप गादिया आणि भाजपचे नितीन पाचर्णे यांच्यात थेट लढत झाली. या निवडणुकीत गादिया यांनी १४ मते मिळवत पाचर्णे (११ मते) यांचा पराभव केला. आणि उपनगराध्यक्षपदी बाजी मारली. शिरूर नगरपरिषदेच्या रसिकलाल धारीवाल सभागृहात उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी विशेष सभा पार पडली. नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे यांच्या…

Read More