Author: Team Shirur Digital

सविंदणे–कवठे येमाई रस्ता मृत्यूच्या वाटेवर; निधी नसतानाही काम सुरू करून नागरिकांच्या जीवाशी खेळ शिरूर दि. २७ (अरुणकुमार मोटे) सविंदणे ते कवठे येमाई हा सुमारे ५ किलोमीटरचा महत्त्वाचा ग्रामीण रस्ता गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत टाकून दिल्याने परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व वाहनचालक अक्षरशः हैराण झाले आहेत. खडीकरण करून रस्ता तसाच सोडण्यात आल्याने आज हा रस्ता विकासाचा नव्हे तर अपघातांचा मार्ग ठरत आहे.या रस्त्यावरून दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर व शालेय वाहने प्रवास करतात. मात्र खडी उखडलेली, ठिकठिकाणी खोलगट खड्डे, उडणारी दगडधोंडे यामुळे वाहन चालवणे म्हणजे जीव मुठीत धरून प्रवास करण्यासारखे झाले आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी…

Read More

शिरूर दि. २७ ( अरुणकुमार मोटे) चोरट्यांनी आता देवाच्याच दारात चोऱ्या करण सुरु केल असून या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होऊ लागली आहे! पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री सोमेश्वर मंदिरात चोरट्यांनी थेट दानपेटीच लांबवल्याची धक्कादायक घटना( दि. २३ ) रोजी समोर आली असून चार दिवस उलटूनही न कारेगाव -रांजनगाव एमआयडीसी पोलिसांना अद्याप या चोरट्यांना गजाआड करता आले नाही. भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र असलेल्या मंदिरातच चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २३ च्या रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनीपरिसरात प्रवेश करत थेट गर्भगृहाजवळ ठेवलेली दानपेटी उचलून नेली. ही संपूर्ण घटना मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली…

Read More

घोडनदी (ता. शिरूर) येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय व वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचे भव्य उद्घाटन शिरूर दि. २७ ( अरुणकुमार मोटे) घोडनदी(ता. शिरूर ) येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय व वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे मा. ना. न्यायमूर्ती संदीप मारणे व अरिफ डॉक्टर यांच्या शुभहस्ते आज संपन्न झाले. या ऐतिहासिक प्रसंगी न्यायव्यवस्थेतील मान्यवर, वकील बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक घोडनदी वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय सरोदे यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना पुणे जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी सांगितले की, शिरूर ते पुणे हे अंतर लक्षात घेता अतिशय वर्दळीचा मार्ग असून पक्षकारांना न्यायालयीन कामकाजासाठी मोठा…

Read More

रिक्षाचालक ते नगरसेवक व आता सार्वजनिक बांधकाम समिती सभापती,सुनिल जाधव यांचा संघर्षातून नेतृत्वापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास… शिरूर, दि. २४ ( अरुणकुमार मोटे) शिरूर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ मधून सामान्य रिक्षाचालक ते नगरसेवक आणि पुढे सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती असा थक्क करणारा प्रवास करत सुनिल शंकरराव जाधव यांनी शिरूरच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात आपली ठळक छाप उमटवली आहे. कष्ट, प्रामाणिकपणा आणि लोकांशी थेट संवाद या बळावर त्यांनी उभा केलेला हा प्रवास आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. सामान्य कुटुंबात जन्मलेले सुनिल जाधव हे श्रमिक वर्गातील प्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. रिक्षाचालक म्हणून शहरभर फिरताना त्यांचा थेट संपर्क सर्वसामान्य नागरिकांशी आला. याच अनुभवातून…

Read More

शिरूर दि. २४ ( अरुणकुमार मोटे) जिल्हा परिषद निवडणुकांच्या रणधुमाळीत शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी–कवठे येमाई गट सध्या संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेत असून, या गटातून चार मातब्बर नेत्यांनी तूल्यबळ शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वातावरण अक्षरशः पेटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केलेले राजेंद्र पोपटरााव गावडे आणि त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी दामूआण्णा घोडे, बाळासाहेब डांगे व डॉ. सुभाष पोकळे यांच्यात थेट प्रतिष्ठेची लढत उभी ठाकली आहे. चारही उमेदवारांच्या अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान बेट भागातील शेकडो कार्यकर्ते, युवक, महिला व ग्रामस्थ रस्त्यावर उतरल्याने शिरूर शहरासह परिसरात दिवसभर वाहनांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. दुचाकी-चारचाकी ताफे, फटाके, घोषणाबाजी आणि शक्तीप्रदर्शनामुळे ही…

Read More

     दामू अण्णांना झेडपीपर्यंत नेण्याचा संकल्प शिरूर | प्रतिनिधी “होतील की नाही?” म्हणता म्हणता अखेर जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला आणि तब्बल आठ वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे गावागावात नवचैतन्य संचारले आहे. सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचण्यासाठी झेडपीची पायरी चढणे हे प्रत्येक नेतृत्वाचे स्वप्न असते. मात्र, हे स्वप्न आता केवळ नेत्याचे न राहता बेट भागातील सामान्य माणसाचे सामूहिक ध्येय बनले आहे. बेट भागासह संपूर्ण शिरूर तालुका, आंबेगाव व जुन्नर परिसर ज्या नेतृत्वाच्या प्रेमात पडला आहे, ते नाव म्हणजे — टाकळी हाजीचे भाग्यविधाते दामू अण्णा घोडे. आजच्या पैशांच्या राजकारणात धनदांडग्यांच्या बळावर सत्ता हस्तगत करण्याची स्पर्धा सुरू असताना, पैशाच्या जोरावर नव्हे तर…

Read More

शिरूर  | राजकारण म्हणजे केवळ सत्तेची गणितं नव्हे, तर माणसांशी नातं जोडण्याची जबाबदारी आहे, हे शिरूर तालुक्याच्या बेट भागात पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील माजी आदर्श सरपंच व सध्या जिल्हा परिषद सदस्यपदाचे उमेदवार दामूशेठ धोंडीबा घोडे उर्फ दामू आण्णा यांच्या समाजाभिमुख उपक्रमाने जनतेच्या मनात विश्वासाचं स्थान निर्माण केलं आहे. “प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होऊन यथाशक्ती योगदान देणे” हा त्यांचा उपक्रम केवळ सामाजिक उपक्रम न राहता, लोकाभिमुख नेतृत्वाचा आदर्श ठरत आहे. लग्नसोहळे, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम असोत किंवा घरातील दुःखद प्रसंग— दामू आण्णा स्वतः उपस्थित राहून कुटुंबीयांच्या भावना समजून घेतात. नवदांपत्याचा सन्मान, पालकांचा आदर आणि प्रेमपूर्वक भेटवस्तू…

Read More

शिरूर (प्रतिनिधी)  | शिरूर ग्रामीण–न्हावरे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ लोकनेते आर. बी. जगदाळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली न्हावरे पंचायत समिती गणातील गुणाट परिसरात भव्य होम टू होम प्रचार दौरा पार पडला. या प्रचार दौऱ्यात जिल्हा परिषद उमेदवार वृषाली बबन वाळके व न्हावरे पंचायत समिती गणाचे उमेदवार दीपक पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लोकनेते आर. बी. जगदाळे पाटील यांनी गावोगावी जाऊन स्थानिक ग्रामस्थांशी थेट संवाद साधत विकासात्मक प्रश्नांची माहिती घेतली. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची गरज असल्याची भूमिका त्यांनी प्रभावीपणे मांडली. त्यांच्या विचारांना ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वागत केले. प्रचार…

Read More

शिरूर, दि. २३ (अरुणकुमार मोटे) शिरूर तालुक्यातील तरुणाईला पोखरणाऱ्या एमडी ड्रग्जच्या वाढत्या विळख्याला अखेर पोलिसांनी मोठा धक्का दिला असून, या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण पुणे ग्रामीणसह अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, ड्रग्स रॅकेटचे धागेदोरे अनेक तालुक्यांपर्यंत पसरले असल्याचे तपासातून समोर येत आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये १) शहादक शेख (रा. शिरूर), २) श्यामसुंदर गुजर (पोलीस हवालदार,अहिल्यानगर), ३) माऊली उर्फे ज्ञानदेव शिंदे (रा. कुरुंद, हमालवाडी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर), ४) महेश गायकवाड (रा. हिंगणी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) ५) त्रषिकेश चित्तर (रा. कुरुंद, हमालवाडी.ता. पारनेर) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या पैकी…

Read More

शिरूर दि. २३ ( अरुणकुमार मोटे) : विभक्त रहात असलेल्या पत्नीला पतीने बोलावून तिच्यावर चाकूने चेहऱ्यावर, गळ्यावर वार करून तिचा खून केल्याची घटना वाडेबोल्हाई येथे जोगेश्वरी हायस्कूलच्या पाठीमागे गुरुवारी (दि.२२) रात्री साडे नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. नम्रता शैलेंद्र व्हटकर असे खून झालेल्या पत्नीचे नाव असून शैलेंद्र प्रकाश व्हटकर (रा. बकोरी) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत शाहरुख पठाण (रा. शिरसवडी) याने फिर्याद दिली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शैलेंद्र व नम्रता यांचा दोन वर्षापूर्वी विवाह झाला होता. नम्रता हिचे शाहरुख याच्यासोबतचे प्रेमसंबंध असल्याचे समजल्याने तो वारंवार भांडण करत होता.…

Read More