चौघांना अटक, १८ लाखांचा मुद्देमाल जप्त रांजणगाव एमआयडीसी | (साहेबराव लोखंडे) रांजणगाव एमआयडीसी जवळील खंडाळे माथा (ता. शिरूर) येथील एका इलेक्ट्रॉनिक कंपनीतील केबल वायर चोरी प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोठे यश मिळवले असून चौघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. २ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री कंपनीतील केबल वायर बंडल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शिक्रापूर येथील फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे — १) विकास संतोष पवार (वय २७, रा. मुखई, इंदिरानगर,…
Author: Team Shirur Digital
शिरूर दि. १३ ( अरुणकुमार मोटे) : शिरूर पोलीस स्टेशन येथे विवाहित महिलेच्या छळप्रकरणी पतीसह सासरच्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शिरूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सपना पंकज डोके (वय २५, रा. रामलिंग, तुकाईमळा, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा विवाह दि.२४ मे २०२५ रोजी झाला. लग्नानंतर त्या सासरी नांदत असताना पती पंकज नवनाथ डोके, सासरे नवनाथ हनुमंत डोके, सासू सविता नवनाथ डोके तसेच इतर नातेवाईकांनी वेळोवेळी मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपींकडून त्यांना वारंवार शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करण्यात आली. तसेच उपाशी ठेवून मानसिक…
दोन बड्या नेत्यांच्या पक्षांतराची शक्यता… शिरूर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांमधील संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेनंतर आंबेगाव–शिरूर विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर येथील दोन बडे नेते लवकरच राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी प्रक्रियेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची महत्त्वाची भूमिका होती. मात्र त्यांच्या निधनानंतर काही स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेतल्याची भावना निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांनी सुचवलेल्या उमेदवारांना अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याची चर्चा आहे. निवडणूक काळात काही ठिकाणी स्थानिक नेतृत्वाने थेट अथवा अप्रत्यक्षपणे विरोधी उमेदवारांना मदत केल्याचे आरोप होत आहेत. विशेषतः शिरूर–आंबेगाव मतदारसंघात…
शिरूर दि. १२ (अरुणकुमार मोटे) शिरूर तालुक्यातील मौजे सरदवाडी हद्दीत आयएफबी कंपनीजवळ बुधवारी (दि. ११) उशिरा रात्री धारधार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. ११ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ११.१५ वाजण्याच्या सुमारास आरोपी नितीन उर्फ देवा सुरज चव्हाण (वय २६, रा. पिंपळगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे) व गणेश तानाजी सांळुखे (वय १९, रा. निरगुडसर, ता. आंबेगाव, जि. पुणे) यांनी कोणत्यातरी कारणावरून संतोष बाळासो पवार (वय २४, रा. करडे, ता. शिरूर, जि. पुणे) याच्यावर हल्ला केल्याचा…
दिलीप वळसे पाटील,देवदत्त निकम यांच्या चुकीच्या राजकारणाचा राष्ट्रवादीला मोठा फटका.. शिरूर, दि. १२ (अरुणकुमार मोटे) शिरूर तालुक्यातील बेट भागात यंदाची झालेली चौरंगी जिल्हा परिषद निवडणूकीची लढत अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली. वर्षानुवर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या भागात प्रथमच ‘राजेंद्र गावडे ‘ यांच्या रुपाने कधी नव्हे ते “कमळ” फुलले असून पंचायत समितीची दोन्हीही जागा कमळाच्या ताब्यात आल्या आहेत. त्यामुळे गावडे घराण्याची प्रतिष्ठा राखली गेली असून माजी आमदार पोपटराव गावडे हे या निकालाने सुखावले आहे . विजयी सभेत त्यांनी विरोधकांवर खालच्या भाषेत चांगलेच तोंडसुख घेतल्याची चर्चा आहे.राष्ट्रवादीला मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवामागे स्थानिक पातळीवरील आंबेगावातील बड़े नेते दिलीप…
शिरूर | (साहेबराव लोखंडे) शिरूर तालुक्यातील माळवाडी येथील मीनल सायन्स ॲकॅडमीच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला निरोप समारंभ, करिअर मार्गदर्शन व पालक मेळावा उत्साहात पार पडला. रविवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी वृक्षावन फार्महाऊस येथे दोन सत्रांत हा कार्यक्रम झाला.कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात संस्थेची ओळख करून देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करण्यात आले. स्व. मीनल ताई यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेल्या या संस्थेमार्फत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणसेवा दिली जात आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून साईबाबा संस्थान शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर (आयएएस) उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. प्रमुख मार्गदर्शक योगेश पुंड यांनी विद्यार्थ्यांना…
शिरूर तालुक्यातील बेट भागात चोरट्यांचा धुमाकूळ : चार दिवसांत पाच रोहित्र फोडले; कवठे येमाईत भरदिवसा घरफोडी शिरूर, दि. १२ (अरुणकुमार मोटे) – शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी पोलिस दूरक्षेत्राच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मलठण, कवठे येमाई आणि सविंदणे परिसरात अवघ्या चार दिवसांत पाच विद्युत रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या तारांची चोरी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे कवठे येमाई येथे भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीसह रोख रक्कम लंपास करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मलठण येथील अष्टविनायक महामार्गालगत कॅनॉल रोडवरील विद्युत रोहित्र शुक्रवारी (दि. ६) मध्यरात्री फोडण्यात आले. चोरट्यांनी…
शिरूर, दि. ०७ (अरुणकुमार मोटे) शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत विविध मतदान केंद्रांवर मंगळवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. कोणताही अनुचित प्रकार न घडता, पोलिसांच्या चोख बंदोबस्तात पार पडलेल्या या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत लोकशाहीवरील आपला विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित केला. तालुक्यात एकूण ७५.५९ टक्के मतदान झाले असून तब्बल २ लाख २८ हजार ११३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. शिरूर तालुक्यातील सात जिल्हा परिषद गटांमध्ये झालेल्या या मतदानात १ लाख १८ हजार ६८५ पुरुष, १ लाख ९ हजार ४२२ महिला तसेच ६ तृतीयपंथीय मतदारांचा सहभाग नोंदविण्यात आला. ग्रामीण…
कान्हूर मेसाई | (सुनिल जिते) शिरूर तालुक्यातील संवेदनशील मानल्या जाणाऱ्या रांजणगाव गणपती गटात सुरू असलेल्या ‘काटे की टक्कर’ लढतीत प्रत्येक मताला विशेष महत्त्व आहे. अशा परिस्थितीत स्वतःच्या लग्नाच्या दिवशीही ‘आधी मतदान, मग लग्न’ असा निर्धार करत कान्हूर मेसाई येथील नवरदेव गणेश खर्डे यांनी मतदानाचा हक्क बजावला. आज शनिवारी ( दि.७फेब्रुवारी) सायंकाळी सहा वाजता त्यांचे लग्न असतानाही आणि घरात लगीनघाई सुरू असतानाही, त्यांनी वेळ काढून प्रथम घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार वापरण्याचा निर्णय घेतला. लग्नासाठी शेरवानी परिधान करून ते थेट कान्हूर मेसाई येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर पोहोचले आणि मतदान केले. रांजणगाव गटातील निवडणूक अत्यंत चुरशीची असल्याने एका-एका मताचा हिशोब लावला…
टाकळी हाजी : (साहेबराव लोखंडे) मोबाईल फोनने आज मानवी जीवनात क्रांती घडवून आणली असली, तरी त्याचा अतिवापर सध्या चिंतेचा विषय बनत चालला आहे. गावा- गावांमध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच घटक मोठ्या प्रमाणावर मोबाईलमध्ये गुंतलेले दिसून येत आहेत. घरात असो वा बाहेर, शेतात काम करताना असो वा दुकानात बसताना, प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसून येत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. पूर्वी गावातील चौक, मंदिर परिसर, चावडी, बसस्थानक, बाजारपेठ अशा ठिकाणी नागरिक एकत्र येऊन विविध विषयांवर चर्चा करत असत. सामाजिक, राजकीय, शेतीविषयक तसेच कौटुंबिक प्रश्नांवर मुक्तपणे संवाद होत असे. मात्र आता या ठिकाणी बसलेली टोळकीही एकमेकांशी संवाद न साधता…

