Author: Team Shirur Digital

शिरूर : प्रतिनिधी वनपरिमंडळ अधिकारी कार्यालय, शिरूर यांच्या वतीने शनिवार (दि. २१ मार्च २०२६) रोजी ‘वन अग्निमुक्त दिन’ साजरा करण्यात येणार असून, यानिमित्ताने शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दुपारी १२ वाजता श्री रामलिंग देवस्थान सभागृह, पाबळ रोड , रामलिंग (शिरूर) येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी वन सीमेवरील सर्व गावांतील ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे सदस्य, लोकप्रतिनिधी, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी तसेच पोलीस पाटील यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वन अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा सामूहिक शपथविधी कार्यक्रम होणार आहे. वनपरिमंडळ अधिकारी श्री. भानुदास शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वने ही पाणी, माती, हवामान…

Read More

शिरूर |  प्रतिनिधी टाकळी हाजी परिसरात सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत होत असलेल्या लोडशेडिंगमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, या जाचक वीज कपातीविरोधात ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार दिलीप वळसे पाटील यांना निवेदन देण्यात आले. महावितरणकडून १८ मार्च २०२६ पासून नवीन वीजपुरवठा वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार सायंकाळच्या वेळेत वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, महिला तसेच शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. सायंकाळची वेळ ही विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाची असताना अंधारामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच घरगुती कामांच्या वेळेत वीज नसल्याने महिलांना अंधारात काम करावे लागत आहे. दुसरीकडे, दिवसा वीजपुरवठा नसल्यामुळे शेतीची कामे ठप्प…

Read More

जांबुत, (प्रफुल्ल बोंबे) दि. १७— शैक्षणिक वर्ष २०२५— २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये पिंपरखेड (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इयत्ता पाचवीची विद्यार्थीनी सौम्या सुनिल वरे हिची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे परिसरातून अभिनंदन करण्यात येत असुन १५ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या या परीक्षेत सौम्याने उत्तम यश संपादन करून जिल्ह्यात शाळेचा नावलौकिक वाढविला असून तिच्या या यशामागे मुख्याध्यापक पी. सी. बारहाते, वर्गशिक्षक लहू गाजरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. दरवर्षी भारत सरकारकडून घेण्यात येणाऱ्या या परीक्षेस हजारो विद्यार्थी सहभागी होऊन हि परीक्षा देत असतात. यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता सहावी ते…

Read More

बिबट्यांच्या भीतीमुळे दिवसा वीजपुरवठ्याची मागणी; लोडशेडिंग वेळेत बदलाचीही मागणी टाकळी हाजी : प्रतिनिधी टाकळी हाजी (ता. शिरूर) परिसर हा बिबट प्रवण क्षेत्रात येत असल्याने येथील शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शेतीसाठी दिवसा थ्री फेज वीजपुरवठा सुरू ठेवावा तसेच सायंकाळच्या लोडशेडिंगच्या वेळेत बदल करावा, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने महावितरणकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शासनाने यापूर्वी शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून दिवसा थ्री फेज वीजपुरवठा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शेतकरी सुरक्षितपणे शेतीची कामे करू शकत होते. मात्र, मागील काही दिवसांपासून कृषी पंपासाठी वीजपुरवठा दिवसा आणि रात्री अशा दोन शिफ्टमध्ये करण्यात येत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी बिबट्यांच्या भीतीखाली शेतात जावे…

Read More

शिरूर, दि. १८ ( अरुणकुमार मोटे)   शिरूर तालुक्यातील दहिवडी परिसर पुन्हा एकदा हादरला आहे. मांजरेवस्ती येथे १२ वर्षीय साईराज गणेश मांजरे याचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह उसाच्या फडात आढळल्याने संपूर्ण परिसरात भीती, संताप आणि संशयाचे गडद सावट पसरले आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे ही केवळ दुर्घटना नसून काहीतरी गंभीर रहस्य दडले आहे का, असा प्रश्न आता सर्वत्र उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साईराज हा तळेगाव ढमढेरे येथील राय कुमार गुजर प्रशालेत इयत्ता सहावीत शिक्षण घेत होता. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेला साईराज मंगळवारी दुपारी दोन वाजल्यापासून बेपत्ता होता.…

Read More

शिरूर : प्रतिनिधी शिरूर येथील दिग्दर्शक, लेखक व निर्माते रामदास राऊत यांनी २०२० साली तृप्ती फिल्म प्रोडक्शनची स्थापना करून ग्रामीण व शहरी भागातील नवोदित कलाकारांना मोठा मंच उपलब्ध करून दिला आहे. विशेष म्हणजे तमाशा कलावंत, नाट्य कलाकार, रील्स कलाकार तसेच इतर नवोदितांना कोणत्याही प्रकारची ऑडिशन प्रक्रिया न ठेवता आपल्या चित्रपटांमध्ये संधी देण्याचे काम त्यांनी केले आहे. तृप्ती टीम प्रोडक्शनचे आजपर्यंत सुमारे २०० हून अधिक लघुचित्रपट प्रदर्शित झाले असून या माध्यमातून अनेक नवोदित कलाकारांना अभिनयाची संधी मिळाली आहे. ग्रामीण भागातील हसवणाऱ्या कलेला व्यासपीठ देण्याचे महत्त्वाचे काम राऊत करत असल्याने त्यांच्या कार्याची विशेष दखल घेतली जात आहे. बालपणापासूनच कलेची आवड असल्याने राऊत…

Read More

शिरूर, दि. १३ (अरुणकुमार मोटे)  शिरूर येथील श्री स्वामी विवेकानंद लॉ कॉलेजमध्ये परीक्षेदरम्यान गैरप्रकार व विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप विद्यार्थिनीने केल्यानंतर या प्रकरणाची तालुक्यात मोठी चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, महाविद्यालय व्यवस्थापनाने या आरोपांवर सविस्तर खुलासा करत संबंधित आरोप पूर्णपणे खोटे, निराधार व महाविद्यालयाची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेले असल्याचे स्पष्ट केले आहे. महाविद्यालय व्यवस्थापनाच्या वतीने शिरूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे ही एक नोंदणीकृत शैक्षणिक संस्था असून तिच्या अंतर्गत आश्रमशाळा व लॉ कॉलेज अशा संस्था कार्यरत आहेत. या संस्थांमध्ये नियमित शैक्षणिक कार्य सुरू असून शैक्षणिक…

Read More

शिरूर, दि. ११ (अरुणकुमार मोटे) शिरूर तालुक्यात चर्चेत असलेल्या कथित ‘सुलभ’ भिशी घोटाळ्याने दिवसेंदिवस अधिक गंभीर रूप धारण केले असून या प्रकरणातील काही नवीन बाबी आता समोर येऊ लागल्या आहेत. नागरिकांसह काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची चर्चा असताना, या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडत असल्याचे चित्र दिसत आहे. या घोटाळ्यात सुमारे ३० पेक्षा अधिक नागरिकांनी कारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिले असतानाही अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण आहे. दरम्यान, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देत “पोलिसांना अनधिकृत भिशी चालवण्यास परवानगी नसताना पोलिसच अशा योजनांना पाठबळ देत असतील…

Read More

शिरूर तालुक्यातील दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा शिरूर–मलठण मार्ग शिरूर सार्वजनिक बांधकाम विभागातील मुजोर आधिकार्याच्या निष्क्रीय कामगिरीमुळे अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. या अधिकाऱ्याला ठेकेदारांकडून नीट खड्डे सुद्धा बुजून घेता आले नाही. त्याचे कारणही तसेच आहे कारण हा मुजोर अधिकारी पुणे येथे राहत असून त्याचे या ठेकेदारांवर व रस्त्यावर त्यांचे कसलेच लक्ष नाही. सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आंदोलन करूनही हा रस्ता आजही खड्ड्यांच्या विळख्यात तसाच आहे. डागडुजी केल्यानंतरही हा रस्ता असा खड्डेमय बनलेला आहे हे आपण या फोटोच्या माध्यमातून पाहू शकता. त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. अनेक वेळा निधी खर्च झाल्याचा दावा करण्यात आला, डागडुजीची कामे झाल्याचे…

Read More

शिरूर, दि. ९ (अरुणकुमार मोटे)  शिरूर येथील श्री विवेकानंद लॉ कॉलेजमध्ये परीक्षेदरम्यान गैरप्रकार व विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप करत एका विद्यार्थ्याने शिरूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या तक्रारीत परीक्षेच्या काळात काही विद्यार्थ्यांकडून मोबाईलचा वापर करून गैरमार्गाने उत्तरं मिळविणे, तसेच परीक्षेच्या प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचे आरोप करण्यात आले आहेत.दिनांक ४ फेब्रुवारी ते ८फेब्रुवारी या दरम्यान कॉलेजमध्ये अवैधरित्या भ्रष्टाचार करत प्राध्यापक व मॅनेजमेंट स्टाफने विदयार्थ्यांकडून आर्थिक लाच घेऊन प्रथम सेमिस्टरच्या उत्तरपत्रिका परिक्षा वेळेच्या व्यतिरीक्त बोलावून लिहायला देण्यात आल्या आहे.व निकाल पूर्णपणे पक्षपात करून मॅनेज केला गेला आहे. संबंधित प्रकार प्रकार कॉलेजच्या CCTV मध्ये रेकॉर्ड…

Read More