Author: Team Shirur Digital

शिरूर, दि. ६ (अरुणकुमार मोटे)  शिरूर तालुक्यात सध्या चर्चेत असलेल्या कथित ‘सुलभ’ भिशी घोटाळ्याने दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण केले असून या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. नागरिकांकडून तक्रार अर्ज दाखल होऊनही अद्याप गुन्हा नोंदवला गेलेला नसल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे होणार का? असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक आणि गुंतवणूकदारांकडून उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने “सुलभ भिशी”च्या नावाखाली अनेक वर्षांपासून भिशी चालवत असल्याची चर्चा आहे. सुरुवातीच्या काळात लहान रकमा घेऊन वेळेवर परतावा देत विश्वास संपादन करण्यात या महिलेला यश आले. त्यामुळे अनेकांनी तिला विश्वासाने पैसे देण्यास सुरुवात केली.…

Read More

शिरूर, दि. ५ : गर्भधारणेपूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ (पीसीपीएनडीटी) कायद्याअंतर्गत शिरुर तालुक्यातील ढोकसांगवी परिसरातील पाचंगेवस्ती येथील लाइफ केअर रुग्णालयामध्ये गर्भलिंग निदान चाचणी होत असल्याच्या पार्श्वभुमीवर आरोग्य विभाग व गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत बी.ए.एम.एस शिक्षण घेतलेले डॉ. आकाश मालगुंडे यांच्या रुग्णालयामध्ये पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. वाघोली पोलीस स्टेशनच्या पोलीस शिपाई प्रतीक्षा पानसरे यांनी रुग्णासोबत जाऊन प्रत्यक्ष सापळा रचला. दलाल नरेंद्र ठाकरे, (रा. केसनंद, ता. हवेली, जि. पुणे ) याच्या मार्फत मोबाईल ॲपच्या सहाय्याने विविध रुग्णांची गर्भलिंग निदान तपासणी केल्याचे संयुक्त तपासात…

Read More

शिरूर दि. ०५ ( अरुणकुमार मोटे) शिरूर तालुक्यात सध्या एकाच चर्चेला उधाण आले आहे. “सुलभ भिसी”च्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या एका महिलेचा कथित कारनामा समोर येत असून, यात बडे पोलिस अधिकारी–कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचेही तब्बल ३० कोटी रुपयांपर्यंत नुकसान झाल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. कारेगाव पोलिस स्टेशनमध्ये रोजची हजेरी, पोलिसांशी सलगी, अधूनमधून जेवणावळी, वारंवार भेटीगाठी अशा पद्धतीने संबंधित महिलेने पोलिसांचा विश्वास संपादन केल्याची चर्चा रंगली आहे. “घरच्यासारखी” वागणूक मिळवून तिने आपले जाळे शांतपणे विणले. सुरुवातीला छोट्या रकमा, वेळेवर परतावा आणि आकर्षक व्याजदर यामुळे अनेकांचा तिच्यावर विश्वास बसला. हळूहळू “सुलभ भिसी”च्या माध्यमातून मोठ्या रकमा जमा होऊ लागल्या. पोलिसांमध्ये गुंतवणूक सुरू असल्याचे…

Read More

शिरूर दि. ०४ ( अरुणकुमार मोटे) शिरूर ते मलठण दरम्यानचा मुख्य मार्ग गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत राहिला आहे. तालुक्यातील दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा रस्ता आजही खड्डेमय अवस्थेत असल्याने वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कोंढण ओढ्याच्या जवळ रस्ता अतिशय खराब झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे.अनेक वेळा डागडुजी करण्यात आली, निधी खर्च झाल्याचे सांगण्यात आले; मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्याची परिस्थिती “जैसे थे”च राहिली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, पावसाळा सुरू झाला की या रस्त्यावरील खड्ड्यांचे प्रमाण दुपटीने वाढते. काही ठिकाणी डांबर पूर्णपणे उखडून गेले असून मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत…

Read More

शिरूर दि. ०४ ( अरुणकुमार मोटे) शिरूर तालुक्यात भिसी (चिट फंड) योजनेच्या नावाखाली महिला व पुरुष पोलिस कर्मचारी तसेच काही पोलिस अधिकाऱ्यांकडून विश्वास संपादन करून लाखो रुपये गोळा करून अनेकांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात काही पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांनीही पैसे गुंतवल्याची माहिती समोर येत आहे.या प्रकरणामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून पोलिस दलातही याची बऱ्याच दिवसापासून मोठी कुजबुज सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील एका महिलेने काही दिवसांपुर्वी विश्वास संपादन करून “विश्वासार्ह भिसी योजना” सुरू केल्याचे सांगत अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना आकर्षित केले. नियमित मासिक हप्त्यांच्या स्वरूपात रक्कम जमा करून ठराविक कालावधीनंतर मोठी रक्कम परत…

Read More

टाकळी हाजी : (साहेबराव लोखंडे) सभासदांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना राबविणाऱ्या बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेने अपघाती विमा योजनेतून पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपली आहे. संस्थेच्या सभासद स्वर्गीय वंदना कैलास घोडे (रा. टाकळी हाजी, ता. शिरूर) यांचा पाबळ येथे मोटारसायकल अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. पतसंस्थेने सर्व सभासदांचा प्रत्येकी एक लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा उतरविला असून, त्याअंतर्गत स्वर्गीय घोडे यांच्या वारसांना विमा दावा मंजूर करून देण्यात यश आले. या माध्यमातून स्वर्गीय वंदना घोडे यांचे वारसदार दत्तात्रय कैलास घोडे यांना १ लाख रुपयांचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष नामदेव थोरात, संचालक चंद्रकांत लामखडे,…

Read More

शिरूर, दि. ०१ ( अरुणकुमार मोटे) ग्रामीण भागातील नागरिकांचे महसूल, जमीन, दाखले व विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रश्न थेट गावपातळीवर सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” टप्पा क्र. १ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दि. ०१ मार्च रोजी विदयाधाम प्रशाला, शिरूर येथे पूर्वतयारी बैठक पार पडली. बैठकीचे अध्यक्षस्थान उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी भूषविले. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्यासाठी हा उपक्रम राज्य शासनाचा महत्त्वाचा कार्यक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, नायब तहसीलदार, कृषी अधिकारी, पंचायत समिती व नगर परिषद अधिकारी, मंडल अधिकारी,…

Read More

शिरूर दि. ०१ ( अरुणकुमार मोटे) धार्मिक उत्साह, भक्तीभाव आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळालेला “श्री शिवमहापुराण कथा” सोहळा शिरूरमध्ये ऐतिहासिक ठरला आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या कथेला कथेच्या ६ व्या दिवशी लाखोंच्या संख्येने शिवभक्तांनी उपस्थिती लावल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात जमलेली गर्दी शिरूरच्या इतिहासात अभूतपूर्व मानली जात आहे. या भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन पी. आर. धारीवाल फाऊंडेशन यांच्या वतीने करण्यात आले होते. फाऊंडेशनने केलेल्या सुयोग्य नियोजनामुळे एवढ्या मोठ्या गर्दीतही कुठेही चेंगराचेंगरीची किंवा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली नाही. व्यवस्थापनाची शिस्त आणि नियोजनशक्ती यामुळे हा कार्यक्रम अनेकांसाठी आदर्श ठरला. कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी…

Read More

: शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत शिरूर – मलठण रस्त्यावरील आमदाबाद फाट्याजवळ रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या भीषण अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे तेथील नागरिक सांगत आहे शिरूर पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात १६ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास आमदाबाद–मलठण महामार्गावर, माशेरेमळा येथील नितीन थोरात यांच्या घरासमोर घडला. फिर्यादी शिवम सत्यवान साळवे (रा. मलठण, ता. शिरूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कार चालक संदीप प्रभाकर पुंडे (रा. कान्हूर मेसाई, जि. पुणे) याच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्यांतर्गत…

Read More

शिरूर शहरालगत शिरूर ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील विकसित झालेल्या बाबुरावनगर या उपनगरातील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्वर्गीय बाबुरावजी पाचर्णे यांच्या दूरदृष्टीतून मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत आणि शिरूर शहराला पर्याय म्हणून बाबुरावनगरची उभारणी करण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात सुमारे अडीच कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार योजना, शाळा, रस्ते अशा अनेक विकासकामांना चालना मिळाली होती. मात्र त्यांच्या निधनानंतर बाबुरावनगरकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात महसूल देणारा हा परिसर आज मूलभूत सुविधांअभावी त्रस्त झाल्याचे चित्र दिसत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडून ओपन प्लॉटची देखभाल किंवा विकास तर होत नाहीच, उलट त्यांचे रूपांतर कचराकुंड्यांमध्ये…

Read More