Author: Team Shirur Digital

शिरूर, दि. २४ (अरुणकुमार मोटे) : सरदवाडी गावच्या हद्दीत करडे घाटावर मोकळ्या जागेत विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला शिरूर पोलिसांनी जेरबंद केले. गणेश परमेश्वर वेरूळकर (वय २३, सध्या रा. यश ईन चौक, कारेगाव, ता. शिरूर; मूळ रा. आसलगाव बाजार, ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयात त्याला हजर केला असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ४.५० वाजण्याच्या सुमारास सरदवाडी गावच्या हद्दीत करडे घाट चढून गेल्यानंतरच्या मोकळ्या जागेत गणेश वेरूळकर हा संशयास्पदरीत्या आढळून आला. त्याची…

Read More

शिरूर, दि. २३ (अरुणकुमार मोटे) : शिरूर शहरातील मार्वल इन लॉजिंगमध्ये नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणानंतर या लॉजिंगच्या कारभारावर संशयाचे सावट अधिक गडद झाले आहे. तरुणीला नशा आणणारी पांढरी पावडर देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याच लॉजिंगमध्ये काही दिवसांपूर्वी मेफेड्रॉन (एमडी) जप्त झाल्याची कारवाई झाल्याने ‘नशेली पावडर आली कुठून?’ आणि ‘या दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का?’ याचा तपास होणे अत्यावश्यक ठरले आहे. या प्रकरणात तक्रारीत पांढऱ्या रंगाची नशा आणणारी पावडर खायला दिल्याचे नमूद आहे. ही पावडर नेमकी कोणत्या अमली पदार्थाची होती, हे तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे. मात्र, नागरिकांमध्ये ती एमडीसदृश…

Read More

·शिरूर, दि. २२ (अरुणकुमार मोटे) : शिरूर शहरातील मार्वल कम्फर्ट (सुरज) लॉजिंगच्या खोलीत २० ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) आढळून आल्याच्या कारवाईनंतर अंमली पदार्थांच्या व्यवहारासह आता लॉज व्यवस्थापनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असली, तरी लॉज मालक अथवा व्यवस्थापनाला कधी आरोपी करणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शिरूर पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर अंतरावर हे ठिकाण असून येथे अनेक दिवसांपासून य हे अवैध धंदे या लॉजिंग मधून चालत होते. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली मग शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस नक्की काय करतात. शिरूर पोलिसांची भूमिका यात संशयास्पद असल्याची चर्चा सुरू शिरूरकरांमध्ये होत…

Read More

शिरूर, दि. २० (अरुणकुमार मोटे) : शिरूर शहरातील मार्वल कम्फर्ट (सुरज) लॉजिंगच्या खोलीत तब्बल २० ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) विक्रीच्या उद्देशाने बाळगणाऱ्या दोघांना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केल्याने शहरातील अंमली पदार्थांच्या काळ्या बाजाराचे धागेदोरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पोलिसांनी या कारवाईत २० ग्रॅम एमडीसह सुमारे ९ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र, या कारवाईनंतर आणखी एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.लॉजिंगमध्ये अंमली पदार्थांचा व्यवसाय सुरू असल्याचा पोलिसांचा आरोप असेल, तर त्या ठिकाणच्या लॉजिंग मालकाची किंवा व्यवस्थापनाची जबाबदारी काय? पोलिसांनी दादा धावडे (वय २७, रा. राजापूर, ता. श्रीगोंदा) आणि अमोल राजाराम पोटावळे (वय ३५, रा.…

Read More

टाकळी हाजी | ( साहेबराव लोखंडे) “संताचिये पायी हा माझा विश्वास…” या जगदगुरु तुकोबाराय यांच्या संतवचनातून संतांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत ह.भ.प. कृष्णा महाराज चव्हाण यांनी भक्ती, नामस्मरण आणि संतसंगतीचे जीवनातील महत्त्व विशद केले. टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे सुरू असलेल्या श्री विठ्ठल-रुख्मिणी अखंड हरिनाम सप्ताहातील किर्तनसेवेत ते बोलत होते. कृष्णा महाराज म्हणाले, संतांच्या चरणी ठेवलेला विश्वास हा माणसाला जीवनातील संकटांवर मात करण्याचे बळ देतो. संतांनी समाजाला समता, बंधुभाव, प्रामाणिकपणा आणि मानवतेचा मार्ग दाखविला. त्यांच्या विचारांचे आचरण केल्यास जीवनाला योग्य दिशा मिळते. केवळ धार्मिक विधी करण्यापेक्षा संतांचे विचार आपल्या आचरणात आणणे हीच खरी भक्ती असल्याचे त्यांनी सांगितले. हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने…

Read More

शिरूर दि.१९ ( अरुणकुमार मोटे) शिरूर तालुक्यातील रांजणगाव परिसरात बी.सी. मंडळाच्या नावाखाली नागरिकांकडून ऑनलाइन तसेच रोख स्वरूपात मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा करून आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रांजणगाव पोलिस ठाण्यात मुख्य सुत्रधार सुलभा नवलेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, फिर्यादी बारकू चंदर सोनवणे (वय ४५, व्यवसाय शिक्षक, रा. स. नं. ४७/५, लेन नं. ८, नवीन साईबाबा मंदिराजवळ, चंदननगर, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. रांजणगाव पोलिस ठाण्यात गु.र.नं. ३८५/२०२६ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम, १९९९ तसेच The Price…

Read More

शिरूर, दि. १७ (अरुणकुमार मोटे) : पुणे ग्रामीण पोलिस दलातील नियतकालिक बदल्यांचे आदेश होऊन बराच कालावधी उलटला असतानाही काही अधिकारी व कर्मचारी अद्याप जुन्याच पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसल्याने पोलिस प्रशासनाच्या बदली धोरणाच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, बदली झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे स्पष्ट निर्देश पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी वायरलेसवरून दिल्याचे सांगितले जात असतानाही जिल्हयातील अनेक ठिकाणी आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची चर्चा आहे. यापूर्वी ‘दैनिक प्रभात’ने ‘बदलीचे आदेश कागदावरच; पोलिस कर्मचारी-अधिकाऱ्यांना कार्यमुक्त कधी करणार?’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून या गंभीर बाबीकडे पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर पोलिस अधीक्षकांनी संबंधित अधिकाऱ्यांना बदली झालेल्या अधिकारी…

Read More

शिरूर दि.१४ ( अरुणकुमार मोटे ) टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे लग्नाचे आमिष दाखवून एका ३५ वर्षीय महिलेवर गेल्या दोन वर्षांपासून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. अत्याचाराला विरोध केल्यावर संबंधित महिलेला हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद दिली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी नंदू आनंदा बरडे (रा. टाकळी हाजी, ता. शिरूर) याला शुक्रवारी (दि. १४) रात्री अटक केली. याबाबत पीडित महिलेने शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, टाकळी हाजी येथील पोलीस चौकीच्या पाठीमागे असलेल्या तिच्या राहत्या घरी गेल्या दोन वर्षांपासून ते १३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आरोपीने लग्नाचे…

Read More

­शिरूर दि. ११ ( अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील बाबुरावनगर येथील कोळपे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये हाताच्या फ्रॅक्चरवरील शस्त्रक्रियेदरम्यान २८ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याच्या घटनेने कोळपे हॉस्पिटलच्या उपचार पद्धतीवर मोठे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पूजा राहुल गई (वय २८, रा. रांजणगाव गणपती, मूळ रा. जळगाव जामोद, जि. बुलढाणा) यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी उपचारपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, “हाताच्या फ्रॅक्चरचे ऑपरेशन होते, मग अचानक मृत्यू कसा झाला?” असा संतप्त सवाल पती राहुल गई यांनी उपस्थित केला आहे. पूजा यांना ४ ऑगस्ट रोजी दुचाकीवरून पडल्याने उजव्या हाताच्या कोपराला दुखापत झाली होती. तपासणीनंतर फ्रॅक्चर असल्याचे निदान झाले आणि शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. ६…

Read More

·शिरूर, ता. ११ ( अरुणकुमार मोटे ) : शिरूर शहरालगतच्या जांभळीमळा परिसरात डोंगर फोडून मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन करून त्याची वाहतूक व विक्री सुरू असल्याची तक्रार समोर आली आहे. या कथित बेकायदा उत्खननामुळे परिसरातील डोंगररांग, नैसर्गिक भूभाग आणि पर्यावरणाचा ऱ्हास व येथिल परीसरातील रस्त्यांची पुर्णपणे वाट लागली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याची चर्चा परिसरात असून, त्यामुळे महसूल प्रशासनाच्या कारवाईवर दबाव येत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. जांभळीमळा परिसरातील संबंधित गट क्रमांकात मोठ्या प्रमाणात डोंगर फोडून मुरूम काढला जात असून, तो विविध वाहनांमधून इतरत्र वाहून नेला जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या उत्खननासाठी आवश्यक…

Read More