Author: Team Shirur Digital

शिरूर च्या जांभळीमळ्यात डोंगर फोडून मुरूमाची ‘बेकायदा’ वाहतूक पर्यावरणाचा ऱ्हास; पंचनामा करून संबंधितांवर कारवाईची तहसीलदारांकडे मागणी शिरूर, ता. १० ( वार्ताहर ) : शिरूर शहरालगतच्या जांभळीमळा परिसरात डोंगर फोडून मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन करून त्याची वाहतूक व विक्री सुरू असल्याची तक्रार समोर आली आहे. विनापरवाना सुरू असलेल्या या कथित उत्खननामुळे परिसरातील डोंगररांग, नैसर्गिक भूभाग तसेच सार्वजनिक रस्त्याला धोका निर्माण होत असल्याचा दावा करण्यात आला असून, या प्रकरणाची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करावा, अशी मागणी शिरूर तहसीलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तहसील कार्यालयाकडे सादर केलेल्या निवेदनानुसार, जांभळीमळा येथील संबंधित गट क्रमांकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात डोंगर फोंडून डोंगरातील मुरूम काढण्याचे…

Read More

शिरूर, दि. २९ (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून गंभीर गुन्ह्यांची मालिका काही केल्या थांबण्याचे नाव घेत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिहार पेक्षाही गंभीर परिस्थिती शिरूर मध्ये निर्माण झाल्याचे विदारक चित्र दिसत आहे. दिवसाढवळ्या खून, खुनाचा प्रयत्न, घरफोड्या, सोनसाखळी चोरी, दुचाकी चोरी, विद्युत रोहित्र चोरी, बेकायदेशीर अग्निशस्त्रांचा वापर आणि ड्रग्ज, अवैध धंद्यांच्या वाढत्या घटनांमुळे शिरूरची कायदा-सुव्यवस्था धोक्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. खुणाच्या गुन्ह्यातील आरोपींना रस्त्याने मारहाण करीत त्याचे चित्रिकरण करत ते सोशल मिडीयावर दाखवत पोलिस ऍक्टिव्ह झाल्याचे दाखवून मानवी हक्काचे उल्लंघन ते करत आहे. याबाबत न्यायालयात व मानवी हक्क आयोगात दाद मागणार असल्याचे एका…

Read More

शिरूर, दि. २८(अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात वाढत्या गंभीर गुन्ह्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, “शिरूर पोलिसांचा गुन्हेगारांवरचा वचक कमी झाला आहे का?” असा सवाल आता शिरूरकरांकडून उपस्थित केला जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून खून, खुनाचा प्रयत्न, घरफोड्या, सोनसाखळी चोरी, दुचाकी चोरी, विद्युत रोहित्र चोरी तसेच बेकायदेशीर अग्निशस्त्रांचा वापर अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये व अवैध्य धंद्यामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी शिरूर पोलीस ठाण्यात कर्तव्यदक्ष, धाडसी आणि दबंग पोलीस निरीक्षक नेमावा, ड्रग्स माफिया आणि अवैध धंद्यांवर कठोर कारवाई व्हावी तसेच वाढती गुन्हेगारी आटोक्यात यावी, या मागण्यांसाठी आंदोलन आणि…

Read More

शिरूर, दि. २६ ( अरुणकुमार मोटे):  शिरूर तालुक्यातील जांबूत गावाच्या हद्दीतील एका विहिरीत सुमारे ५५ ते ६० वर्षे वयोगटातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मयत प्रमाणे नोंद करण्यात आली असून, मृताची ओळख पटविण्याचे आवाहन शिरूर पोलिसांनी केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे वय अंदाजे ५५ ते ६० वर्षे असून त्याने अंगात काळ्या रंगाचा हाफ बाह्यांचा टी-शर्ट आणि कमरेला राखाडी रंगाची ट्रॅक पॅन्ट परिधान केलेली आहे. ट्रॅक पॅन्टच्या उजव्या खिशावर “Shiv-Naresh” असे इंग्रजीत लिहिलेले आहे. सध्या मृताची ओळख पटलेली नसून, अशा वर्णनाची व्यक्ती बेपत्ता असल्याची माहिती कोणाकडे असल्यास त्यांनी तात्काळ…

Read More

शिरूर, दि. २६ (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याचा पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी चार्ज घेतल्यानंतर गेल्या महिन्यांत गंभीर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. वारंवार दुचाकी चोरी, सोनसाखळी चोरी, खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, घरफोडी तसेच विद्युत रोहीत्र चोरीसारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून केला जात असून, या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या कार्यकाळातील गुन्हेगारी परिस्थितीची चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः गेल्या महिनाभरात सात दुचाकी चोरीच्या घटना नोंदवल्या गेल्याने वाहनचोरांनी पोलिसांनाच खुले आव्हान दिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अनेक घटनांमध्ये अद्याप आरोपींचा शोध लागलेला नसल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. शहरासह ग्रामीण…

Read More

जांबूत | ( प्रफुल्ल बोंबे) ,दि. २३ शिरूर – आंबेगाव तालुक्यासह उत्तर पुणे जिल्ह्यात आणि विशेषतः बेट भागातील गावांच्या दळणवळणाला चालना मिळावी म्हणून राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून गायमुख –अवसरी – शिक्रापूर या मार्गासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ यांचेकडून सुमारे ४१६ कोटींचा निधी कॉंक्रीटीकरणाच्या कामासाठी मंजूर करण्यात आल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली खरी; मात्र अत्यंत संथ गतीने चालू असलेल्या या कामात असंख्य त्रुटी दिसत असून या कामाबाबत काठापूर खुर्द , पिंपरखेड , जांबूत, शरदवाडी , वडनेर खुर्द आदि गावांतील ग्रामस्थांनी मोठी नाराज दाखवत संताप व्यक्त केला आहे. मात्र विविध वृत्तपत्रातून अनेकदा वृत्त प्रसिध्द होऊनही संबंधित…

Read More

भाग-२ | शिरूर डिजिटल विशेष शिरूर, दि. २३(अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी मंडळ कार्यालयातील कथित अनियमितता आणि नागरिकांच्या तक्रारींवर आधारित शिरूर डिजिटल विशेष मालिकेच्या पहिल्या भागानंतर आता नागरिकांकडून आणखी धक्कादायक आरोप समोर येत आहेत. मंडळ अधिकारी राजेंद्र पोटकुले यांच्या कामकाजाबाबत नागरिक आणि शेतकरी उघडपणे नाराजी व्यक्त करत असून, महसुली कामांसाठी ठराविक रकमेची मागणी केली जात असल्याचा गंभीर आरोप अनेकांनी केला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्ता प्रकरणे, फेरफार अहवाल, विविध महसुली दाखले, खरेदी खताच्या नोंदी, तसेच बैलगाडा शर्यतीच्या परवानगीसाठी आवश्यक असलेल्या अहवालांमध्ये विनाकारण विलंब केला जातो. संबंधित काम वेळेत करून हवे असल्यास पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.…

Read More

भाग-१ | शिरूर डिजिटल विशेष शिरूर, दि. २२ (अरुणकुमार मोटे): राज्य शासनाने महसूल विभागाला पारदर्शक, गतिमान आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी कितीही नियमावली लागू केली, ऑनलाइन सेवा सुरू केल्या आणि नागरिकांना वेळेत सेवा देण्याच्या सूचना दिल्या, तरी शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी मंडळ कार्यालयात मात्र परिस्थिती याच्या अगदी उलट असल्याचा आरोप नागरिक आणि शेतकऱ्यांकडून होत आहे. येथे शेतकऱ्यांच्या कामांपेक्षा हेलपाट्यांनाच अधिक महत्त्व दिले जात असून, “भेट नाही तर नोंद नाही… पैसे दिल्याशिवाय कामच नाही?” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. मंडळ अधिकारी राजेंद्र पोटकुले यांच्या कामकाजाबाबत गेल्या काही महिन्यांपासून असंतोष वाढत असून, सातबारा दुरुस्ती, फेरफार, वारस नोंद, पीकपाणी, महसुली अहवाल यांसारख्या अत्यावश्यक…

Read More

शिरूर, दि. २२ (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा दुपारी एक वाजता झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कुटुंबातील सर्व सदस्य शेतीच्या कामासाठी शेतात गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडत आत प्रवेश केला आणि कपाट फोडून तब्बल १७ तोळे सोन्याचे दागिने, अंदाजे ८ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, दिवसाढवळ्या झालेल्या या घरफोडीमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता बाळासाहेब पडवळ (वय ५२, रा. संविदणे, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २१ जुलै रोजी सकाळी कुटुंबातील सर्वजण…

Read More

शिरूर दि. २२ ( अरुणकुमार मोटे) शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे. अवघ्या पाच वर्षांच्या निष्पाप चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीती, संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.शिरूर तालुक्यात २०१९ पासून बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची ही १३ वी घटना आहे. या घटनेनंतर वन विभागाने तातडीने बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री संदीप वारे (वय ५, सध्या रा. पिंपळसुटी, मूळ गाव पाथर्डी, जि. अहिल्यानगर) ही आपल्या आई-वडिलांसह पिंपळसुटी येथील शेतकरी मच्छिंद्र प्रल्हाद भोसले यांच्या शेतात ऊसतोड कामासाठी वास्तव्यास होती. बुधवारी…

Read More