शिरूर दि. १८ ( अरुणकुमार मोटे) “तुझ्या चुकीच्या सांगण्यामुळे मला कंपनीतून कामावरून काढण्यात आले,” असा जाब विचारत एका तरुणाला रस्त्यात अडवून पाच जणांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शिरूर शहरातील वात्सल्य हॉस्पिटलसमोर घडली. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतिषकुमार जयप्रकाश सिंग (वय २६, रा. सुंदरसृष्टी, शिरूर, मूळ रा. बलिया, उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी (ता. १७) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ते घरी जात असताना शशिकांत गायकवाड (रा. शिक्रापूर) व त्याच्या चार अनोळखी साथीदारांनी त्यांना अडविले. यावेळी “तुझ्यामुळे मला कंपनीतील नोकरी गमवावी लागली,” असा आरोप करत पाचही जणांनी…
Author: Team Shirur Digital
शिरूर दि. १७ ( अरुणकुमार मोटे) शिरुर पोलिस ठाण्याचा कारभार हाती घेताच पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी गुन्हेगारांवर वचक बसविण्यास सुरुवात केली असुन पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक करत त्यांच्या ताब्यातुन तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे असा सुमारे १ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे शिरुर तालुक्यातील अवैध शस्त्र व्यवहारावर मोठा आळा बसला असून पोलीस दलाच्या सतर्कतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि १४ जून २०२६ रोजी रात्री शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण आणि स्थानिक गुन्हे पथक हद्दीत गस्त घालत असताना…
शिरूर, दि. १५ (अरुणकुमार मोटे) टाकळी हाजी दूरक्षेत्रातील गावांमध्ये अवैध व्यवसायांचे जाळे दिवसेंदिवस विस्तारत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. दारू, मटका, जुगार, नशीले पदार्थ विक्रीचे प्रकार उघडपणे सुरू असल्याचा आरोप होत असून, या प्रकारांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी एका आंदोलनादरम्यान पोलीस अधीक्षक शिरूरला येऊन गेले. त्यांच्या आदेशाने पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यावर धडक कारवाई झाल्या. परंतु पुन्हा तेच अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरु झाले असून पोलीस अधीक्षक याकडे लक्ष देणार का?हे पाहणे महत्त्वाचे आहे. या बीटातील एक आधिकारी कितीही बातम्या द्या काही फरक पडणार नाही अशी भाषा वापरत आहे. अशा…
शिरूर, दि. १५ ( अरुणकुमार मोटे) : शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून संतापलेल्या एका २६ वर्षीय नातवाने आपल्या ८४ वर्षीय आजोबांवर लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे सोमवारी (दि. १५) सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, शिरूर पोलिसांनी आरोपी नातवाला अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले आहे. दशरथ यशवंत राऊत (वय ८४, रा. बाभुळसर बुद्रुक, ता. शिरूर) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तर सोमनाथ बाळासाहेब राऊत (वय २६) या नातवाला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मृत दशरथ राऊत यांचे पुत्र दुर्योधन दशरथ राऊत यांनी शिरूर पोलीस…
शिरूर, दि. १२ (अरुणकुमार मोटे) शिरूर तालुक्यासह बेट भागात पुन्हा एकदा अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून दारू, जुगार आणि शिरूर शहरात मटका, ड्रग्ज व्यवसाय अजूनही खुलेआम सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पोलिसांकडून अधूनमधून होणाऱ्या थातूरमातूर कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांमध्ये कोणतीही भीती राहिलेली नसून कारवाईनंतर काही तासांतच हे धंदे पुन्हा सुरू होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. बेल्हा – जेजूरी रस्त्यावरील चांडोह हद्दीतील एका ढाब्यावर ४ वेळा कारवाई होऊनही तेथे दारुविक्री मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. नागरीकांनी तक्रार केल्या नंतर पोलिस तक्रारदारांची नावे ढाबा चालकांना सांगत आहे. अशी चर्चा सुरु आहे. बेट भागातील कवठे येमाई, जांबूत, मलठण, टाकळी हाजी, चांडोह,…
शिरूर दि १३ (अरुणकुमार मोटे) समाजात पत्रकार म्हणुन काम करत असताना आपली आर्थिक बाजु पहिली भक्कम असली पाहिजे. पत्रकार म्हणुन आपण जर आर्थिक हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न केला तर आपण लाचारी स्वीकारली असा त्याचा अर्थ होतो आणि जो माणुस लाचार असतो तो निर्भीड पत्रकारिता करुच शकत नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ समीर राजे यांनी केले.महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका कार्यकारणीची बैठक नुकतीच शिरूर येथे नुकतीच पार पडली. यावेळी डॉ समीर राजे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे , उपाध्यक्षपदी सुनिल जिते तर कार्याध्यक्षपदी अर्जुन शेळके यांची बिनविरोध निवड…
शिरूर, दि. ११ (अरुणकुमार मोटे) शिरूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गंभीर अपघात प्रकरणात पोलिसांनी अपघातानंतर चालक बदलल्याचा धक्कादायक आरोप समोर आला असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३३/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांनुसार गंभीर अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या अपघातात एका लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, इतर काही जण गंभीर जखमी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, या अपघातात प्रत्यक्ष वाहन चालवणारा चालक आणि नंतर गुन्हा दाखल करताना आधिकार्याने आर्थिक तडजोड करून चालक वेगळाच दाखवण्यात आला आहे. अपघातानंतर…
वरूडेतील थरारक खूनप्रकरणाचा अवघ्या ४८ तासांत उलगडा शिरूर. १०( अरुणकुमार मोटे) शिरूर तालुक्यातील वरूडे गावात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या खळबळजनक खूनप्रकरणाचा शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत छडा लावत आरोपीला गजाआड केले आहे. घराबाहेरील ओट्यावर झोपलेल्या ४३ वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणात गावातीलच एका अल्पवयीन मुलाने जुन्या भांडणाचा आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या घटनेमुळे वरूडे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीपर्यंत मजल मारत गुन्ह्याचा उलगडा केल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. उकाड्यामुळे घराबाहेर झोपणे ठरले जीवावर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासो बबन तांबे…
शिरूर, दि. १० (अरुणकुमार मोटे) शिरूर तालुक्यातील फाकटे,चांडोह, टाकळी हाजी,वडनेर, म्हसे सरदवाडी, माळवाडी या गावांमध्ये महावितरणकडून वारंवार करण्यात येणाऱ्या वीज कपातीविरोधात या गावातील ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते शंकर पिंगळे यांच्या मागदर्शनाखाली एकत्र येत मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेत बिबट्यांचा गंभीर प्रश्न त्यात रात्रीची विज कपात या समस्यांचा पाढा वाचून रात्रीचे लोडशेडिंग तात्काळ बंद करण्याची लेखी मागणी केली आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून नागरिकांच्या अडचणींची सविस्तर माहिती प्रशासनापुढे मांडण्यात आली. फाकटे व परिसरातील गावांमध्ये विशेषतः रात्रीच्या वेळेस वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेला पाणीपुरवठा, पिकांची…
किमान वेतनवाढीबाबत लवकरच दिलासा मिळेल : गणेशभाऊ ताठे शिरूर | (साहेबराव लोखंडे) पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्न, अडचणी आणि न्याय्य मागण्यांबाबत आयोजित करण्यात आलेला मार्गदर्शन मेळावा रामलिंग (ता. शिरूर) येथे उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. जिल्हाभरातील ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या या मेळाव्यात कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जाचे गणेशभाऊ ताठे यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या. ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असून त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. किमान वेतनवाढीबाबत सकारात्मक संकेत देत कर्मचाऱ्यांना लवकरच दिलासा मिळेल,…

