शिरूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी विनोद पाटील यांची नियुक्ती संदेश केंजळे यांची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात बदली; शिरूरच्या कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी आता पाटील यांच्याकडे शिरूर, दि. ८ (अरुणकुमार मोटे) : शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांची पुणे येथील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील यांनी नुकताच शिरूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला असून त्यांच्या नियुक्तीमुळे पोलीस दलात नव्या नेतृत्वाची सुरुवात झाली आहे. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी शिरूर पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेतली होती. त्यांच्या कार्यकाळात शिरूर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच…
Author: Team Shirur Digital
शिरूर, दि. ८ ( अरुणकुमार मोटे): सोशल मीडियावरून ओळख वाढवत एका अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा, लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा तसेच धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची आरोपी साहील दगडू शेख (रा. ठिकेकरवाडी, ता. जुन्नर) याच्याशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. या ओळखीचे पुढे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. ऑक्टोबर २०२४ मध्ये आरोपीने तरुणीला आंबेगाव तालुक्यातील वडगाव पीर परिसरात भेटण्यासाठी बोलावले. तेथे तिचे फोटो व व्हिडीओ काढून पुढे ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर…
शिरूर, दि. ३ ( अरुणकुमार मोटे)– लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर दबाव टाकून डिजिटल पुरावे हटविण्यास भाग पाडण्याचा गंभीर प्रकार शिरूर तालुक्यात उघडकीस आला आहे. सार्वजनिक हिताच्या विषयांवर वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराला धमक्या देत सोशल मीडियावरील व्हिडीओ आणि बातम्या हटविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रांजणगाव गणपती येथील अँड.विकास कुटे यांच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदोडी (ता. शिरूर) येथील पत्रकार व शेतकरी तेजस रामदास फडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 296, 351(2), 351(3) व 352 अन्वये हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे पत्रकारिता क्षेत्रात खळबळ उडाली असून पत्रकारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.…
शिरूर दि. ३ : ( अरुणकुमार मोटे) माहिती अधिकार, लोकसेवा हक्क, रुग्ण हक्क, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती, महिला व बालक संरक्षण, पर्यावरण संवर्धन आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून समाजहिताचे कार्य करणारे डिंग्रजवाडी (कोरेगाव भीमा), ता. शिरूर येथील यशोदा माहिती अधिकार प्रशिक्षण संस्था, पुणेचे संस्थापक अध्यक्ष खंडुआण्णा भरत गव्हाणे यांना राज्यस्तरीय ‘समाजभूषण पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या गौरवामुळे शिरूर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. माणूस परिवार महाराष्ट्र राज्यच्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथील सभागृहात…
शिरूर दि. ०१ ( अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर सोमवार दि. ०१ रोजी सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान अक्षरशः गोळीबाराच्या आवाजाने दणाणून गेला. भरधाव वाहनाला धडक देऊन अडवण्यात आले आणि त्यानंतर झालेल्या थरारक गोळीबारात एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे शिरूर शहरासह संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विशाल काळे (वय ३१, रा. बाबुराव नगर, शिरूर) याचा घटनास्थळी मृत्यू झाला असून केदार झाडगे (रा. कुंभार आळी, शिरूर) हा गंभीर जखमी झाला आहे. सायंकाळी सुमारे ५ ते ५.३० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार,…
शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नांसाठी प्रभावी कामाचा निर्धार निघोज | कुकडी प्रकल्प डावा कालवा वितरिका स्तरीय पाणीवापर संस्था महासंघ, नारायणगावच्या सन २०२६-२७ या वर्षासाठी नवनिर्वाचित कार्यकारिणीची घोषणा व सत्कार समारंभ अहिल्यानगर जिल्ह्यातील निघोज ( ता.पारनेर) येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. घोड व कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समिती सदस्य प्रकाश वायसे यांच्या अध्यक्षतेखाली व अमृता रसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात विविध पदांवरील निवडी जाहीर करण्यात आल्या. महासंघाच्या अध्यक्षपदी दिलीप मदगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी प्रकाश वायसे, उपाध्यक्षपदी पांडुरंग ढवळे, तर कार्यकारी संचालकपदी रविंद्र शिंदे व रघुनाथ निचित यांची निवड करण्यात आली. संचालक मंडळात चंद्रकांत लामखडे, अमोल कातोरे, संपतराव पानमंद, अमृता…
शिरूर दि. २९ ( अरुणकुमार मोटे) शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे कार्यालयात सध्या १ गुंठा, ५ गुंठे, ६ गुंठे अशा अत्यल्प क्षेत्रफळाच्या जमिनींची मोठ्या प्रमाणावर सामाईक खरेदीखत नोंदणी होत असल्याने गुंठेवारी प्रकरणात मोठ्या घोटाळ्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संपूर्ण व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी निळवादळ संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा दीपिका ताई भालेराव यांनी केली आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी शेती जमिनींचे नियमबाह्य तुकडे करून त्यांची सामाईक खरेदीखत करण्यात येत असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे १ ते ६ गुंठ्यांच्या जमिनींची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर होत असतानाही संबंधित महसूल विभागातील तलाठी व मंडल अधिकारी यांच्याकडून या व्यवहारांची अधिकृत नोंद घेतली जात…
शिरूर दि. २५ ( अरुणकुमार मोटे) शिरूर नगरपरिषदेने पाबळ रोड ते विद्याधाम प्रशाला परिसरातील रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबवून अनेक हातगाडी व्यावसायिक, लहान दुकानदार व नागरिकांवरील कारवाई केली. मात्र याच मार्गावर रस्त्याच्या मध्यरेषेपासून अंतराच्या नियमानुसार काही मोठ्या व प्रभावशाली संस्थांची बांधकामे आणि संरचना अद्याप कायम असल्याने नगरपरिषदेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, शिवसेवा मंडळाची इमारत, शिरूर नगरपरिषदेची जुनी इमारत तसेच विद्याधाम प्रशालेच्या काही संरचना या रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरत असून त्यामुळे संबंधित ठिकाणी रस्ता अरुंद झालेला आहे. जर अतिक्रमण हटविण्याचे नियम सर्वांसाठी समान असतील, तर या बांधकामांवरही कारवाई होणार का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात…
शिरूर दि.१९ ( अरुणकुमार मोटे) : शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री, गावठी हातभट्टी याविरोधात शिरूर पोलिसांनी सलग धडक कारवाया करत आठ गुन्हे दाखल केले असून तब्बल दीड लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली चांडोह, डोंगरगण, टाकळी हाजी, मलठण, कवठे येमाई आणि आमदाबाद परिसरात विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत गावठी हातभट्टी दारू, विदेशी दारू, तसेच जुगार अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले. मौजे टाकळी हाजी येथील साबळेवाडी परिसरातील घोड नदी पात्रालगतच्या काटवनात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सुरेश चोरे व संतोष मुजाळ या आरोपींकडून तब्बल…
शिरूर दि.१८ ( अरुणकुमार मोटे) शिरूर तालुक्यातील सोनेसांगवी परिसरात पिंपरी चिंचवड गुन्हे विरोधी पोलिस पथकावर झालेल्या धाडसी गोळीबाराच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून, या गंभीर प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम उभारली आहे. अनेक तासांच्या शोधमोहीमेनंतरही हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागले नसल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकाला सराईत गुन्हेगारांच्या हालचालींबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर संबंधित संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळच्या सुमारास सोनेसांगवीजवळील परिसरात पोलिसांनी सापळा रचला होता. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी पाठलाग सुरू केला असता आरोपींकडून अचानक…

