टाकळी हाजी | प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील माळवाडी येथील भैरवनाथवाडी येथे भैरवनाथ यात्रा उत्सव बुधवारी (दि.१) मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.सकाळी अभिषेक, हळद समारंभ, मांडव डहाळे, होमहवन व काठी उभारण्याचे धार्मिक विधी पार पडले. सायंकाळी काठी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत उत्सवाला रंगत आणली.
रात्री हभप गणेश महाराज वाघमारे यांचे कीर्तन झाले. कीर्तनात त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या विचारांवर प्रकाश टाकत, समाजात एकोपा व समतेचा संदेश दिला. संतांनी कधीही जातपात मानली नाही. आज प्रत्येक समाजाच्या घरात ज्ञानेश्वर महाराजांची पूजा होते,असे सांगत त्यांनी भक्तीचा खरा अर्थ स्पष्ट केला. सज्जनांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवासाठी सरपंच सोमनाथ भाकरे, दौलत पांढरकर, बाबाजी रासकर, राहुल गारुडकर, परशुराम भाकरे, विलास भाकरे, कैलास भाकरे,किरण रासकर,सागर भाकरे आदींनी विशेष सहकार्य केले.


