Author: Team Shirur Digital

शिरूर दि. १७ (अरुणकुमार मोटे ) दोन दिवसांपूर्वी शिरूर डिजिटल. कॉम ने “शिरुरच्या बाबुरावनगरात पायाभूत सुविधांचा ग्रामपंचायतीकडून बोजवारा” या सदराखाली शिवसाई मंगल कार्यालयाजवळील ड्रेनेज तुंबल्याची बातमी केली होती. आठ दिवसापासून रखडलेल्या या समस्येचे निराकरण झाले. परंतु दुसरीकडे डेक्कन शाळेसमोरील रस्त्यावर असलेल्या चेंबरमधून दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे. हा रस्ता सतत वर्दळीचा असून डेक्कन शाळेतील विद्यार्थी आणि पालक या रस्त्याने ये-जा करत असतात. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार गेल्या दोन महिन्यात तीन वेळेस हे ड्रेनेज तुंबले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाला कळवल्यानंतर दोन-चार दिवसाच्या पाठपुराव्यानंतर ड्रेनेज चोक काढण्याचे काम होते. परंतु आठ दिवसांनी पुन्हा “जैसे थे” परिस्थिती आहे. हे रस्त्यावरील ड्रेनेज तुंबल्यामुळे परिसरातील इमारतींच्या ड्रेनेजची घाण…

Read More

उपनगराध्यक्षपदी मितेश प्रदीप गादिया दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, भाजपला विरोधी बाकावर शिरूर दि. १६( अरुणकुमार मोटे) शिरूर नगरपरिषदेच्या राजकारणात मोठी आणि अनपेक्षित उलथापालथ पाहायला मिळाली. निवडणुकीदरम्यान एकमेकांविरोधात दंड थोपटलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अखेर उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकत्र आले आणि भाजपच्या गणितांना धक्का दिला.उपनगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे मितेश प्रदीप गादिया आणि भाजपचे नितीन पाचर्णे यांच्यात थेट लढत झाली. या निवडणुकीत गादिया यांनी १४ मते मिळवत पाचर्णे (११ मते) यांचा पराभव केला. आणि उपनगराध्यक्षपदी बाजी मारली. शिरूर नगरपरिषदेच्या रसिकलाल धारीवाल सभागृहात उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी विशेष सभा पार पडली. नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे यांच्या…

Read More

रस्त्यांची दुरवस्था, खड्डे व बेकायदेशीर गतिरोधकांमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ शिरूर, दि. १६ (उद्धव जाधव) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेला अष्टविनायक महामार्ग हा महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींना एकाच साखळीत जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. धार्मिक पर्यटनाला चालना देत व्यापारी केंद्रे विकसित करून अर्थव्यवस्था बळकट करण्याचा यामागील उद्देश होता. मात्र प्रत्यक्षात हा महामार्ग सध्या ‘विकासाचा मार्ग’ न राहता अपघातांचा महामार्ग ठरत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. अष्टविनायक महामार्गावरील रस्त्यांची दयनीय अवस्था, जागोजागी पडलेले खड्डे, उखडलेले डांबरीकरण, तसेच बेकायदेशीर व शास्त्रशुद्ध नसलेले गतिरोधक यामुळे वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विशेषतः रांजणगाव ते सिद्धटेक या मार्गावरील करडे ते आंबळे…

Read More

शिरूर, दि. १६ (उद्धव जाधव) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेला अष्टविनायक महामार्ग हा महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींना एकाच साखळीत जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. धार्मिक पर्यटनाला चालना देत व्यापारी केंद्रे विकसित करून अर्थव्यवस्था बळकट करण्याचा यामागील उद्देश होता. मात्र प्रत्यक्षात हा महामार्ग सध्या ‘विकासाचा मार्ग’ न राहता अपघातांचा महामार्ग ठरत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. अष्टविनायक महामार्गावरील रस्त्यांची दयनीय अवस्था, जागोजागी पडलेले खड्डे, उखडलेले डांबरीकरण, तसेच बेकायदेशीर व शास्त्रशुद्ध नसलेले गतिरोधक यामुळे वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विशेषतः रांजणगाव ते सिद्धटेक या मार्गावरील करडे ते आंबळे दरम्यानच्या देशमुख वस्ती परिसरात सुमारे एक किलोमीटरच्या पट्ट्यात…

Read More

शिरूर, दि. १६ (उद्धव जाधव) मुख्यमंत्री अकादमीच्या संकल्पनेने पूर्णविनायक महामहाराष्ट्रातील अष्टविनायकांना एकाच साखळीत जोडणारा महत्त्वाकांक्षी विस्तार मानला. धर्माला चालना देत व्यापारी केंद्रे पर्यटन विकास अर्थव्यवस्था बलाकट करण्याचा यामागील उद्देश होता. मात्र, हा महामार्ग न सध्या ‘विकासाचा मार्ग’ राहतो पार्किंगचा महामार्ग ठरत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. अष्टवि नायक महामार्ग गतिलेंची स्थिती योग्य, जागोजागी उदयले खड्डे, उंबर डांबरीकरण, तसेच बेकायदेशीर आणि शास्त्रशुद्ध नसलेले प्रतिरोधक वाहन चालकांना अक्षर जीव मुठीत वाहन प्रवास लागत आहे. भारताचे रांजणगाव ते सिद्धटेक या मार्गाने ते आंबळे देश वस्ती दरम्यान सुमारे एक किलोमीटरच्या पट्ट्यात पूर्णतः उखडलेले आहे. या ठिकाणी लहानमोटा विकक्या व खड्ड्य खड्ड्य विखेस्वारांचे पुढील…

Read More

जांबुत : प्रफुल्ल बोंबे | दि. १६ महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीनंतर आता राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजू लागले आहे. पुणे जिल्ह्याचे विशेष लक्ष लागलेल्या शिरूर तालुक्यातील कवठे येमाई–टाकळी हाजी जिल्हा परिषद गटात अटीतटीच्या पंचरंगी लढतीचे संकेत स्पष्ट होत असून, इच्छुक उमेदवारांनी पक्षांतर्गत हालचाली वाढवत प्रचाराला सुरुवात केली आहे. या गटात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), भाजप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तसेच अन्य घटकांमुळे लढत अधिकच रंगतदार झाली आहे. अनेक निवडणुकांमध्ये शांत भूमिका घेतलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला कवठे येमाई येथील एका उद्योजकाच्या पक्षप्रवेशामुळे बळकटी मिळाली असली, तरी जनतेचा कौल कुणाच्या पारड्यात…

Read More

शिरूर दि.१५ ( अरुणकुमार मोटे) : सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर व वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनांच्या अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी नुकतीच ग्रामीण रुग्णालय शिरूर येथे अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती , आरोग्य सेवेशी संबंधित अनेक गंभीर व धक्कादायक त्रुटी समोर आल्या आहेत. यामध्ये रुग्णांच्या वापरातील बेडशीट अस्वच्छ व नियमानुसार नसणे,रुग्णालय परिसरात, वॉर्ड व शौचालयांमध्ये स्वच्छतेचा पूर्ण अभाव,ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक असतानाही रुग्ण भरतीचे प्रमाण संशयास्पदरीत्या कमी,जिल्हा स्तरावरून उपलब्ध असलेली औषधे वेळेवर उचलून रुग्णालयात न आणणे, त्यामुळे रुग्णांना आवश्यक उपचार मिळत नसणे या गंभीर त्रुटींमुळे ग्रामीण व गरीब रुग्णांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असून, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर गंभीर…

Read More

शिरूर आगाराला १५ हजारांची दणदणीत फटकारणी…, विद्यार्थ्याच्या तक्रारीला न्याय शिरूर दि. १५ ( अरुणकुमार मोटे) | ग्रामीण भागातील प्रवाशांच्या संयमाचा अंत झाला आहे, याचा ठळक पुरावा पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या एका ऐतिहासिक निकालातून समोर आला आहे. पूर्वसूचना न देता बसफेऱ्या रद्द करणे, अर्ध्या मार्गातून बसेस परत आणणे आणि वेळापत्रकाची खुलेआम पायमल्ली करणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिरूर आगाराला आयोगाने जोरदार दणका दिला असून विद्यार्थ्याला १५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.ही लढाई लढली ती सविंदणे (ता. शिरूर) येथील विद्यार्थी सागर तान्हाजी रोकडे यांनी आणि ती केवळ स्वतःसाठी नव्हे, तर हजारो ग्रामीण प्रवाशांच्या हक्कांसाठी ठरली आहे. सागर रोकडे…

Read More

शिरूर दि. १५ ( अरुणकुमार मोटे) | शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर आता उपनगराध्यक्षपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी, १६ जानेवारी रोजी उपनगराध्यक्षपदाची निवडणूक होणार असून, याच दिवशी तीन स्वीकृत नगरसेवकांचीही निवड केली जाणार आहे. त्यामुळे शिरूरच्या स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगली आहे. अलीकडेच पार पडलेल्या नगराध्यक्षपदाच्या पंचरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवार ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांनी विजय मिळवला. या विजयामुळे शिरूर नगरपालिकेत युवा नेतृत्वाला संधी मिळाल्याचे मानले जात आहे.यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत प्रथमच सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी अधिकृत चिन्हांवर निवडणूक लढवली. त्यात भारतीय जनता पक्षाचे ११ नगरसेवक निवडून आले असून सर्वाधिक संख्याबळ भाजपकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More

कान्हूर मेसाई:ता. १४ (सुनिल जिते )  कान्हूर मेसाई (ता.शिरूर) येथील रहिवासी व लष्करातील जवान मनोज कुमार दळवी नुकतेच तीस वर्षांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेनंतर निवृत्त झाले. त्यानिमित्ताने रविवारी(ता.११) सकाळी गावकऱ्यांनी त्यांची मिरवणूक काढली. मेसाई कार्यालयात झालेल्या भव्य सेवापूर्ती गौरव सोहळ्यात त्यांचा ग्रामस्थांनी कुटुंबियांसह सपत्नीक सत्कारही केला. यावेळी दळवी यांना गहिवरून आले होते. राष्ट्राच्या संरक्षणासाठी आहोरात्र सीमेवर पाहारा देणाऱ्या प्रत्येक सैनिकाबाबत नागरिकांमध्ये कायमच आदराची भावना असते. त्याच्या निवृत्तीनंतरही हा भाव कायम असलेला पाहायला मिळतो. कान्हूर मेसाई येथे निवृत्त होऊन आलेल्या सुभेदार मनोज कुमार दळवी यांच्याबाबत असाच अभिमान बाळगत येथील नागरिकांनी व कुटूंबानी त्यांचा निवृत्ती सोहळा साजरा करून सैनिकांप्रती असलेला आदर व अभिमान…

Read More