शिरूर, दि. २३ (अरुणकुमार मोटे) शिरूर तालुक्यातील तरुणाईला पोखरणाऱ्या एमडी ड्रग्जच्या वाढत्या विळख्याला अखेर पोलिसांनी मोठा धक्का दिला असून, या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण पुणे ग्रामीणसह अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, ड्रग्स रॅकेटचे धागेदोरे अनेक तालुक्यांपर्यंत पसरले असल्याचे तपासातून समोर येत आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये १) शहादक शेख (रा. शिरूर), २) श्यामसुंदर गुजर (पोलीस हवालदार,अहिल्यानगर), ३) माऊली उर्फे ज्ञानदेव शिंदे (रा. कुरुंद, हमालवाडी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर), ४) महेश गायकवाड (रा. हिंगणी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) ५) त्रषिकेश चित्तर (रा. कुरुंद, हमालवाडी.ता. पारनेर) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या पैकी…
Author: Team Shirur Digital
शिरूर दि. २३ ( अरुणकुमार मोटे) : विभक्त रहात असलेल्या पत्नीला पतीने बोलावून तिच्यावर चाकूने चेहऱ्यावर, गळ्यावर वार करून तिचा खून केल्याची घटना वाडेबोल्हाई येथे जोगेश्वरी हायस्कूलच्या पाठीमागे गुरुवारी (दि.२२) रात्री साडे नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. नम्रता शैलेंद्र व्हटकर असे खून झालेल्या पत्नीचे नाव असून शैलेंद्र प्रकाश व्हटकर (रा. बकोरी) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत शाहरुख पठाण (रा. शिरसवडी) याने फिर्याद दिली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शैलेंद्र व नम्रता यांचा दोन वर्षापूर्वी विवाह झाला होता. नम्रता हिचे शाहरुख याच्यासोबतचे प्रेमसंबंध असल्याचे समजल्याने तो वारंवार भांडण करत होता.…
खाकी वर्दीतील पोलिसच निघाला ड्रग्स रॅकेटचा दरोडेखोर, गुजरच्या ‘श्याम ‘चे सुंदर कारनामे होणार उघड शिरूर दि. २३ ( अरुणकुमार मोटे) केंद्र सरकारच्या नशामुक्त भारत अभियानाला मोठा धक्का देणारे आणि संपूर्ण राज्यातील पोलीस यंत्रणेला हादरवून सोडणारे एक धक्कादायक प्रकरण पुणे ग्रामीण जिल्ह्यात शिरूर येथे उघडकीस आले आहे. शिरूर तालुक्यात तब्बल वीस कोटी रुपये किमतीच्या एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्स प्रकरणात थेट पोलीस कर्मचारीच मास्टरमाइंड असल्याचे निष्पन्न झाले असून, या प्रकरणामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. ड्रग्स बरोबरच त्याचे अनेक काळे धंदे समोर आणण्याची मागणी आता नागरिकांकडून होत आहे. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) दि. १७ जानेवारी रोजी शिरूर तालुक्यात कारवाई करत…
शिरूर दि. २२ ( अरुणकुमार मोटे) : ड्रग्स प्रकरणात अटकेत असलेला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलिस हवालदार श्यामसुंदर गुजर आणि आरोपी प्रकरणात ड्रग्सचा माल पुरवणारा माऊली शिंदे (रा. कोहकडी, ता. पारनेर) यांच्यातील संबंध केवळ अंमली पदार्थांपुरते मर्यादित नसून, मागील वर्षभरापासून सुरू असलेल्या अनेक काळ्या धंद्यांपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक माहिती विश्वासार्ह सूत्रांकडून समोर येत आहे. विशेष म्हणजे या बेकायदेशीर व्यवहारात आरोपी शिंदे याचा भाऊही सक्रियपणे सामील असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून, तपासाची व्याप्ती आता अधिक व्यापक करण्याची आवशक्यता निर्माण झाली आहे. शिंदे हा जाणीवपूर्वक भावाला गुन्हातून लपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा भाऊ अनेक ड्रग्स विक्रेत्यांच्या संपर्कात असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली…
जप्त केलेला ‘एमडी’ मुद्देमाल विकल्याचा धक्कादायक प्रकार शिरूर, दि. २२ (अरुणकुमार मोटे) पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलिसांनी उघडकीस आणलेले सुमारे वीस कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज प्रकरण आता केवळ अंमली पदार्थ तस्करीपुरते मर्यादित न राहता थेट पोलीस यंत्रणेतील काळ्या कारभारावर प्रकाश टाकणारे ठरले आहे. या प्रकरणात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचारी श्यामसुंदर रामदास गुजर (वय ३९, रा. नेप्ती, ता. नगर) याला अटक करण्यात आल्याने राज्याच्या गृहखात्यात खळबळ उडाली आहे. शिरूर तालुक्यात एमडी ड्रग्ज जप्तीच्या तपासादरम्यान या रॅकेटचे धागेदोरे थेट अहिल्यानगरपर्यंत पोहोचले. सखोल तपासात धक्कादायक बाब समोर आली की, ड्रग्जचा पुरवठा करणारा कुठलाही सराईत गुन्हेगार नसून, तो स्वतः…
शिरूर दि. २१ ( अरुणकुमार मोटे) : अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई करत असल्याचे वरवर चित्र रंगवणाऱ्या यंत्रणांच्या आतच गुन्हेगारीची मुळे खोलवर रुजल्याचे धक्कादायक वास्तव शिरूर पोलिस व गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणने उघड केले आहे. आतापर्यंत अंदाजे तब्बल १० किलो वजनाचे, सुमारे २० कोटी रुपये किमतीचे ड्रग्स जप्त करण्यात आले असून, या प्रकरणात नगर स्थानिक गुन्हे शाखेतील (LCB) पोलिस हवालदारच थेट ड्रग्स रॅकेटमध्ये सामील असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही बाब केवळ कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी नसून, संपूर्ण पोलिस यंत्रणेच्या विश्वासार्हतेला हादरा देणारी ठरली आहे. ड्रग्स तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी शाम सुंदर गुजर (रा. नेप्ती, ता. नगर, जि. अहिल्यानगर) हा नगर…
शिरूर दि. १९( अरुणकुमार मोटे) सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म, बी. फार्म, एम. फार्म), इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन आळेफाटा लोकल ब्रांच तसेच नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय फार्मा मॉडेल मेकिंग स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडली. या स्पर्धेत राज्यभरातील ३८ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपली कल्पकता, संशोधनवृत्ती आणि तांत्रिक कौशल्य सादर केले. फार्मसी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संकल्पनांना व्यासपीठ देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डि. फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमोल शहा, बी. व एम. फार्मसीचे प्राचार्य डॉ. सचिन कोठावदे, शिरूर एस. टी. सी. ओ. पी.…
शिरूर दि. २० ( अरुणकुमार मोटे) आयुष्यात कितीही संकटे आली तरी महिलांनी खचून न जाता पुन्हा धैर्याने उभे राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशनच्या संस्थापिका ॲड.राणी चोरे यांनी केले. गोलेगाव(ता.शिरूर) येथे तेजस्विनी फाऊंडेशन यांच्या वतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की,प्रत्येक विशेष मूल हे जपताना त्या आईला प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करावा लागतो.आयुष्यात कित्येक वेळा संघर्ष करावा लागला मात्र या संघर्षात खचून न जाता उभा राहता आले. विशेष मुलांच्या पालकांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे.महिलांनी संघर्षात खचून न जाता पुन्हा संकटाचा सामना करत उभे राहायला शिकले पाहिजे असे त्या म्हणाल्या. यावेळी उपस्थित महिलांना सामर्थ्य संस्थेकडून…
शिरूर, दि. १९ (उद्धव जाधव) केंद्र सरकारची आयुष्मान भारत योजना तसेच महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम व इतर कामगार कल्याण मंडळाच्या आरोग्य उपचार योजनांचे कार्ड उपलब्ध असतानाही अपघातग्रस्त कुटुंबाला मोफत उपचार नाकारून हजारो रुपयांचे बिल आकारल्याचा गंभीर प्रकार शिरूर येथील रुबी हॉल संचलित माणिकचंद हॉस्पिटलमध्ये उघडकीस आला आहे. या मनमानी कारभाराविरोधात भारतीय बहुजन पालक संघाने आंदोलनाची तयारी दर्शविली असून रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले आहे. श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथील रहिवासी सयाजी तबाजी आडगळे व सारिका सयाजी आडगळे या दांपत्याकडे आयुष्मान भारत योजना व कामगार कल्याण मंडळाचे वैध उपचार कार्ड असतानाही, “ही कार्डे आमच्या रुग्णालयात चालत नाहीत” असे कारण पुढे करत माणिकचंद हॉस्पिटल प्रशासनाने…
शिरूर, दि. १९ (अरूणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील बेट भागात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय उलथापालथ घडली असून, कवठे येमाई–टाकळी हाजी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दामूआण्णा घोडे यांना उमेदवारी मिळाल्याने गेले अनेक महिने प्रचार करणारे राजेंद्र गावडे व गावडे घराण्याला मोठा जबर धक्का बसला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्वसाधारण जागा आल्याने हा गट आधीपासूनच चर्चेचा केंद्रबिंदू ठरला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार गटाची साथ देत दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपली भूमिका स्पष्ट ठेवली होती. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांचे चिरंजीव राजेंद्र…

