Author: Team Shirur Digital

अजितदादा पवार : महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्व शिरूर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची दुःखद बातमी समजताच टाकळी हाजी–कवठे येमाई जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दामूशेठ घोडे यांना शोक अनावर झाला. अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आधारस्तंभ, मार्गदर्शक नेतृत्व आणि हजारो कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान होते. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात न भरून येणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना दामू घोडे यांनी व्यक्त केल्या. या दुःखद प्रसंगी दामू घोडे यांनी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांप्रती त्यांनी मनःपूर्वक…

Read More

शिरूर दि. २८( अरुणकुमार मोटे) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला आज (बुधवार) सकाळी बारामतीजवळ अपघात झाला असून, या विमान अपघातात अजित पवार (वय ६६) यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात शोककळा पसरली असून सगळ्याच क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. अजित पवार यांचा राज्याच्या राजकारणात गेल्या ४० वर्षांपासून वावर होता. धडाकेबाज निर्णय घेण्याची क्षमता, रोखठोक भाष्य यामुळे अजित पवार चर्चेत कायम राहिले होते. अजितत पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीमध्ये दाखल…

Read More

सविंदणे–कवठे येमाई रस्ता मृत्यूच्या वाटेवर; निधी नसतानाही काम सुरू करून नागरिकांच्या जीवाशी खेळ शिरूर दि. २७ (अरुणकुमार मोटे) सविंदणे ते कवठे येमाई हा सुमारे ५ किलोमीटरचा महत्त्वाचा ग्रामीण रस्ता गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत टाकून दिल्याने परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व वाहनचालक अक्षरशः हैराण झाले आहेत. खडीकरण करून रस्ता तसाच सोडण्यात आल्याने आज हा रस्ता विकासाचा नव्हे तर अपघातांचा मार्ग ठरत आहे.या रस्त्यावरून दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर व शालेय वाहने प्रवास करतात. मात्र खडी उखडलेली, ठिकठिकाणी खोलगट खड्डे, उडणारी दगडधोंडे यामुळे वाहन चालवणे म्हणजे जीव मुठीत धरून प्रवास करण्यासारखे झाले आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी…

Read More

शिरूर दि. २७ ( अरुणकुमार मोटे) चोरट्यांनी आता देवाच्याच दारात चोऱ्या करण सुरु केल असून या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होऊ लागली आहे! पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री सोमेश्वर मंदिरात चोरट्यांनी थेट दानपेटीच लांबवल्याची धक्कादायक घटना( दि. २३ ) रोजी समोर आली असून चार दिवस उलटूनही न कारेगाव -रांजनगाव एमआयडीसी पोलिसांना अद्याप या चोरट्यांना गजाआड करता आले नाही. भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र असलेल्या मंदिरातच चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २३ च्या रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनीपरिसरात प्रवेश करत थेट गर्भगृहाजवळ ठेवलेली दानपेटी उचलून नेली. ही संपूर्ण घटना मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली…

Read More

घोडनदी (ता. शिरूर) येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय व वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचे भव्य उद्घाटन शिरूर दि. २७ ( अरुणकुमार मोटे) घोडनदी(ता. शिरूर ) येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय व वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे मा. ना. न्यायमूर्ती संदीप मारणे व अरिफ डॉक्टर यांच्या शुभहस्ते आज संपन्न झाले. या ऐतिहासिक प्रसंगी न्यायव्यवस्थेतील मान्यवर, वकील बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक घोडनदी वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय सरोदे यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना पुणे जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी सांगितले की, शिरूर ते पुणे हे अंतर लक्षात घेता अतिशय वर्दळीचा मार्ग असून पक्षकारांना न्यायालयीन कामकाजासाठी मोठा…

Read More

रिक्षाचालक ते नगरसेवक व आता सार्वजनिक बांधकाम समिती सभापती,सुनिल जाधव यांचा संघर्षातून नेतृत्वापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास… शिरूर, दि. २४ ( अरुणकुमार मोटे) शिरूर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ मधून सामान्य रिक्षाचालक ते नगरसेवक आणि पुढे सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती असा थक्क करणारा प्रवास करत सुनिल शंकरराव जाधव यांनी शिरूरच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात आपली ठळक छाप उमटवली आहे. कष्ट, प्रामाणिकपणा आणि लोकांशी थेट संवाद या बळावर त्यांनी उभा केलेला हा प्रवास आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. सामान्य कुटुंबात जन्मलेले सुनिल जाधव हे श्रमिक वर्गातील प्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. रिक्षाचालक म्हणून शहरभर फिरताना त्यांचा थेट संपर्क सर्वसामान्य नागरिकांशी आला. याच अनुभवातून…

Read More

शिरूर दि. २४ ( अरुणकुमार मोटे) जिल्हा परिषद निवडणुकांच्या रणधुमाळीत शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी–कवठे येमाई गट सध्या संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेत असून, या गटातून चार मातब्बर नेत्यांनी तूल्यबळ शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वातावरण अक्षरशः पेटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केलेले राजेंद्र पोपटरााव गावडे आणि त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी दामूआण्णा घोडे, बाळासाहेब डांगे व डॉ. सुभाष पोकळे यांच्यात थेट प्रतिष्ठेची लढत उभी ठाकली आहे. चारही उमेदवारांच्या अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान बेट भागातील शेकडो कार्यकर्ते, युवक, महिला व ग्रामस्थ रस्त्यावर उतरल्याने शिरूर शहरासह परिसरात दिवसभर वाहनांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. दुचाकी-चारचाकी ताफे, फटाके, घोषणाबाजी आणि शक्तीप्रदर्शनामुळे ही…

Read More

     दामू अण्णांना झेडपीपर्यंत नेण्याचा संकल्प शिरूर | प्रतिनिधी “होतील की नाही?” म्हणता म्हणता अखेर जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला आणि तब्बल आठ वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे गावागावात नवचैतन्य संचारले आहे. सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचण्यासाठी झेडपीची पायरी चढणे हे प्रत्येक नेतृत्वाचे स्वप्न असते. मात्र, हे स्वप्न आता केवळ नेत्याचे न राहता बेट भागातील सामान्य माणसाचे सामूहिक ध्येय बनले आहे. बेट भागासह संपूर्ण शिरूर तालुका, आंबेगाव व जुन्नर परिसर ज्या नेतृत्वाच्या प्रेमात पडला आहे, ते नाव म्हणजे — टाकळी हाजीचे भाग्यविधाते दामू अण्णा घोडे. आजच्या पैशांच्या राजकारणात धनदांडग्यांच्या बळावर सत्ता हस्तगत करण्याची स्पर्धा सुरू असताना, पैशाच्या जोरावर नव्हे तर…

Read More

शिरूर  | राजकारण म्हणजे केवळ सत्तेची गणितं नव्हे, तर माणसांशी नातं जोडण्याची जबाबदारी आहे, हे शिरूर तालुक्याच्या बेट भागात पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील माजी आदर्श सरपंच व सध्या जिल्हा परिषद सदस्यपदाचे उमेदवार दामूशेठ धोंडीबा घोडे उर्फ दामू आण्णा यांच्या समाजाभिमुख उपक्रमाने जनतेच्या मनात विश्वासाचं स्थान निर्माण केलं आहे. “प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होऊन यथाशक्ती योगदान देणे” हा त्यांचा उपक्रम केवळ सामाजिक उपक्रम न राहता, लोकाभिमुख नेतृत्वाचा आदर्श ठरत आहे. लग्नसोहळे, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम असोत किंवा घरातील दुःखद प्रसंग— दामू आण्णा स्वतः उपस्थित राहून कुटुंबीयांच्या भावना समजून घेतात. नवदांपत्याचा सन्मान, पालकांचा आदर आणि प्रेमपूर्वक भेटवस्तू…

Read More

शिरूर (प्रतिनिधी)  | शिरूर ग्रामीण–न्हावरे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ लोकनेते आर. बी. जगदाळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली न्हावरे पंचायत समिती गणातील गुणाट परिसरात भव्य होम टू होम प्रचार दौरा पार पडला. या प्रचार दौऱ्यात जिल्हा परिषद उमेदवार वृषाली बबन वाळके व न्हावरे पंचायत समिती गणाचे उमेदवार दीपक पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लोकनेते आर. बी. जगदाळे पाटील यांनी गावोगावी जाऊन स्थानिक ग्रामस्थांशी थेट संवाद साधत विकासात्मक प्रश्नांची माहिती घेतली. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची गरज असल्याची भूमिका त्यांनी प्रभावीपणे मांडली. त्यांच्या विचारांना ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वागत केले. प्रचार…

Read More