
शिरूर दि १३ (अरुणकुमार मोटे)
समाजात पत्रकार म्हणुन काम करत असताना आपली आर्थिक बाजु पहिली भक्कम असली पाहिजे. पत्रकार म्हणुन आपण जर आर्थिक हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न केला तर आपण लाचारी स्वीकारली असा त्याचा अर्थ होतो आणि जो माणुस लाचार असतो तो निर्भीड पत्रकारिता करुच शकत नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ समीर राजे यांनी केले.महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका कार्यकारणीची बैठक नुकतीच शिरूर येथे नुकतीच पार पडली. यावेळी डॉ समीर राजे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे , उपाध्यक्षपदी सुनिल जिते तर कार्याध्यक्षपदी अर्जुन शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे राज्याध्यक्ष डॉ. समीर राजे,राज्य उपाध्यक्ष अरुणकुमार मोटे,जिल्हा उपाध्यक्ष तेजस फडके,
जिल्हा संघटक साहेबराव लोखंडे उपस्थित होते
महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाची शिरुर तालुका कार्यकारणी पुढीलप्रमाणे
अध्यक्षः- सागर रोकडे
उपाध्यक्षः- सुनिल जिते
सचिव : योगेश शेंडगे
कार्याध्यक्षः- अर्जुन शेळके
ओंकार भोरडे : खजिनदार
संपर्कप्रमुखः- अक्षय टेमगिरे
कोषाध्यक्षः- किरण पिंगळे-शेलार
प्रसिद्धीप्रमुखः- आबासाहेब थोरात
कार्यकारी समिती अध्यक्ष :- बाबा इनामदार
शिरुर शहराध्यक्ष:- निलेश काळे
सहसंपर्क प्रमुख : धनंजय साळवे
नियोजन समिती अध्यक्ष पुणे जिल्हा – प्रफुल्ल बोंबे
ज्यावेळी पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल होतात. त्यावेळी पत्रकार संघटनेतील प्रत्येक सदस्यांनी त्या पत्रकाराच्या मागे ठाम उभं राहील पाहिजे. तसेच सत्तेमध्ये बसलेली लोक हि कोणाचीच नाहीत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पत्रकार संघटना म्हणजे कोणताही दबाव गट नाही. महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ हे एक कुटुंब आहे. त्यामुळे आपल्या सगळ्या सदस्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. तसेच आपल्या कुटुंबातील व्यक्तीवर म्हणजेच एखाद्या पत्रकारावर जेव्हा वाईट वेळ येईल तेव्हा आपण तेवढ्याच ताकतीने त्याच्या पाठीमागे उभं राहील पाहिजे.
शिरुर तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन त्यांनी तालुक्यातील पत्रकारांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांवर दबाव टाकण्यासाठी दाखल होणाऱ्या खोट्या तक्रारीबाबत शहानिशा करुन पत्रकार संघाच्या माध्यमातून त्यांना सहकार्य करावे.
समीर राजे (राज्याध्यक्ष )
महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ
शिरुर तालुक्यातील अनेक पत्रकारांना ग्रामीण भागात काम करताना विविध प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. अनेकवेळा प्रशासन किंवा राजकीय व्यक्तीच्या माध्यमातून पत्रकारांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार शिरुर तालुक्यात वाढतं असुन याबाबत आम्ही संघटनेच्या माध्यमातुन पत्रकारांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार आहोत.
सागर रोकडे
(तालुकाध्यक्ष)
महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ

