Author: Team Shirur Digital

कान्हूर मेसाई | (सुनिल जिते)  शिरूर तालुक्यातील संवेदनशील मानल्या जाणाऱ्या रांजणगाव गणपती गटात सुरू असलेल्या ‘काटे की टक्कर’ लढतीत प्रत्येक मताला विशेष महत्त्व आहे. अशा परिस्थितीत स्वतःच्या लग्नाच्या दिवशीही ‘आधी मतदान, मग लग्न’ असा निर्धार करत कान्हूर मेसाई येथील नवरदेव गणेश खर्डे यांनी मतदानाचा हक्क बजावला. आज शनिवारी ( दि.७फेब्रुवारी) सायंकाळी सहा वाजता त्यांचे लग्न असतानाही आणि घरात लगीनघाई सुरू असतानाही, त्यांनी वेळ काढून प्रथम घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार वापरण्याचा निर्णय घेतला. लग्नासाठी शेरवानी परिधान करून ते थेट कान्हूर मेसाई येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर पोहोचले आणि मतदान केले. रांजणगाव गटातील निवडणूक अत्यंत चुरशीची असल्याने एका-एका मताचा हिशोब लावला…

Read More

टाकळी हाजी : (साहेबराव लोखंडे) मोबाईल फोनने आज मानवी जीवनात क्रांती घडवून आणली असली, तरी त्याचा अतिवापर सध्या चिंतेचा विषय बनत चालला आहे. गावा- गावांमध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच घटक मोठ्या प्रमाणावर मोबाईलमध्ये गुंतलेले दिसून येत आहेत. घरात असो वा बाहेर, शेतात काम करताना असो वा दुकानात बसताना, प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसून येत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. पूर्वी गावातील चौक, मंदिर परिसर, चावडी, बसस्थानक, बाजारपेठ अशा ठिकाणी नागरिक एकत्र येऊन विविध विषयांवर चर्चा करत असत. सामाजिक, राजकीय, शेतीविषयक तसेच कौटुंबिक प्रश्नांवर मुक्तपणे संवाद होत असे. मात्र आता या ठिकाणी बसलेली टोळकीही एकमेकांशी संवाद न साधता…

Read More

शिरूर | बापू जाधव आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणाऱ्या लोकनेते अजितदादा पवार यांना नियतीची दृष्ट लागली. महाराष्ट्राला हेवा वाटावा अशी विकासकामे आपल्या भागात केवळ अजितदादांमुळेच झाली, ही जाणीव प्रत्येक नागरिकाने ठेवावी. येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये फक्त घड्याळ या चिन्हापुढील बटण दाबून अजितदादांचा विचार जिवंत ठेवण्याचे ऐतिहासिक काम करा, असे आवाहन लोकनेते आर. बी. जगदाळे पाटील यांनी केले. शिरूर ग्रामीण–न्हावरे जिल्हा परिषद निवडणुकीनिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. न्हावरे व शिरूर ग्रामीण पंचायत समिती गणातील प्रत्येक गावात शेकडो कार्यकर्त्यांचा फौजफाटा घेऊन आर. बी. जगदाळे पाटील यांनी दौरे काढत संपूर्ण परिसरात राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी…

Read More

कान्हूर मेसाई, ता.०३:( सुनिल जिते ) राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विकासाच्या संकल्पनेला अभिप्रेत असलेला रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गट नागरिकांची समस्या सोडवून प्रगतीपथावर आणून त्याचा कायापालट करणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार ज्योती मानसिंग पाचुंदकर यांनी दिले आहे. रांजणगाव कारेगाव मुळ जिल्हा परिषद गटात अंतर्गत रस्ते, सांडपाणी, कचरा व्यवस्थापन, जिल्हा परिषदेच्या शाळा, आरोग्य केंद्रे, तसेच सर्व सामान्य नागरिकांना व शेतकरी बंधूंना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन रांजणगाव जिल्हा परिषद गट प्रगतीपथावर आणणार असल्याचे आश्वासन सामान्य मतदार बंधू भगिनींना ज्योती पाचुंदकर यांनी दिले आहे. शिरूर आंबेगावचे भाग्यविधाते आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव कारेगाव…

Read More

शिरूर दि. ०२ (प्रतिनिधी ) टाकळी हाजी ता. शिरूर येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जुन्या कोंडवाड्याच्या जमिनीवर माजी आमदार पोपटराव हरिभाऊ गावडे यांच्या खाजगी संस्थेने बेकायदेशीरपणे कब्जा करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, सिटी सर्वे नोंदी करताना केवळ संस्थेचेच नव्हे तर संस्थेच्या नावानंतर पोपटराव हरिभाऊ गावडे असे स्वतःचे वैयक्तिक नावही जोडण्यात आले होते. हा प्रकार प्रशासनाने सत्तेचा गैरवापर, अधिकाराबाहेरील निर्णय आणि कागदोपत्री फेरफार असा ठरवत तब्बल ४० वर्षांनंतर संबंधित बेकायदेशीर नोंद रद्द केली आहे. ग्रामपंचायतची जमीन, पण नोंद माजी आमदारांच्या नावावर…. मौजे टाकळी हाजी येथील ही जमीन सन १९५२- ५३ पासून १९८५- ८६ पर्यंत सलगपणे ग्रामपंचायत टाकळी हाजीच्या…

Read More

शिरूर | (अरुणकुमार मोटे)  पाबळ (ता. शिरूर) येथे पतीकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी महिलेच्या पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. राजू पांडुरंग जाधव असे आरोपी पतीचे नाव असून अहिला उर्फ भाग्यश्री राजू जाधव (वय ३०), सार्थक राजू जाधव (वय ६) व गौरी राजू जाधव (वय ४ महिने) अशी मृतांची नावे आहेत. पाबळ येथील एका वीटभट्टीवर कामासाठी असलेल्या अहिला उर्फ भाग्यश्री व राजू जाधव या दाम्पत्यामध्ये वारंवार वाद होत असल्याने भाग्यश्री ही मानसिक त्रासाला कंटाळली होती. शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More

कवठे येमाई | कवठे येमाई (ता. शिरूर) येथील उस्मान शामीर पिंजारी (वय ७०) हे ज्येष्ठ नागरिक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी ( दि. ३०) घराबाहेर गेलेले उस्मान पिंजारी दोन दिवस घरी परतलेले नाहीत. घरातील कुणालाही न सांगता ते दुपारच्या सुमारास घरातून बाहेर पडल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. ते पिशवी घेऊन घराबाहेर गेले असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी त्यांचा मुलगा अकबर पिंजारी यांनी शिरूर पोलीस ठाण्यात वडील बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार उस्मान पिंजारी यांचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.सदर व्यक्ती कोणाला आढळल्यास तात्काळ शिरूर पोलीस स्टेशन किंवा टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्राशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक फौजदार…

Read More

शिरूर ता.०१(सुनिल जिते): उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी रविवार (ता.०१) शिरूर येथे शोकसभा पार पडली.शिरूरच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्राने एक कर्तबगार, दूरदृष्टी असलेला आणि जनतेसाठी अखंड झटणारा नेता गमावला असून शिरूरसाठी ही हानी असल्याची भावना शिरूर गटसचिवाच्या वतीने व्यक्त करण्यात आली. अजित पवार यांचे निधन अत्यंत दुःखद व वेदनादायक आहे. त्यांच्या निधनामुळे सहकार क्षेत्राने एका संवेदनशील नेत्यास गमावले असून सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे,’ अशी शिरूर तालुक्यातील संस्थेच्या विविध कार्यकारी सोसायटीत काम करणाऱ्या सचिवांनी भावना व्यक्त केली आहे. ‘अजितदादा हे सहकार चळवळीशी जोडलेले होते. सहकारी साखर कारखाने, बँका,…

Read More

शोकसभेत आठवणींच्या भावनांचा फुटला बांध शिरूर | (सुनिल जिते) उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रासह शिरूर तालुक्यात शोककळा पसरली असून, या दु:खद घटनेच्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. १) शिरूर येथे सहकार क्षेत्रातील सचिवांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. शिरूरच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार असलेल्या अजित पवार यांच्या निधनाने एक कर्तबगार, दूरदृष्टी असलेला व जनतेसाठी अखंड झटणारा लोकनेता हरपल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यांच्या जाण्याने सहकार क्षेत्राची अपूरणीय हानी झाली असून, संवेदनशील नेतृत्वाचा आधार हरपल्याचे मत विविध कार्यकारी सोसायट्यांमध्ये कार्यरत सचिवांनी व्यक्त केले. अजितदादा पवार हे सहकार चळवळीशी अतूट नाते जपणारे नेते होते.…

Read More

शिरूर दि. २९ ( अरुणकुमार मोटे) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून, त्याचा थेट परिणाम जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांवर झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील १२जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी यापूर्वी ५फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान आणि ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी निश्चित करण्यात आली होती. मात्र, सुधारित कार्यक्रमानुसार आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान तर ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार असल्याची अधिकृत घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली…

Read More