शिरूर, दि. २२ ( अरुणकुमार मोटे)
शिरूर पोलीस ठाण्यात एका २७ वर्षीय विवाहित महिलेच्या फिर्यादीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीत आरोपी राहुल साहेबराव वाळके (रा. करडे, ता. शिरूर) याने ओळखीचा फायदा घेत तिला शिरूर पोलीस ठाण्यात नेण्याचे कारण सांगून तसेच पार्टनर असणाऱ्या पोलिसांशी ओळख असल्याचे सांगून आपल्या वाहनातून नेले. तिच्या पतीच्या कथित संबंधांबाबत माहिती देण्याचे आमिष दाखवत आरोपीने तिला नगरच्या दिशेने नेऊन राळेगणसिद्धी परिसरातील एका लॉजमध्ये नेल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, लॉजमधील खोलीत नेऊन आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले तसेच ही बाब कोणालाही सांगितल्यास परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली. ही घटना २९ मे २०२ ६ रोजी घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध पुढील तपास सुरू असून अद्याप अटकेबाबत कार्यवाही प्रलंबित असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक भागवत सोळुंके करीत असून प्रभारी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
या राहुल साहेबराव वाळके यांनी शिरूर मधील दोन जवळच्या पोलिसांशी हाताशी धरून ओम तसत फीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कंपनी स्थापन करून सदर महिलेला तेथे कामावर ठे वले. तिला विविध प्रकारचे आमिष दाखवून दोन पोलिसांशी पार्टनर असल्याने चांगली ओळख असल्याचे दाखवून राहूल वाळके याने तिच्या परिस्थितीचा फायदा घेत तिच्यावरवारंवार अत्याचार केला आहे. अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. या कंपनीला पत्नीच्या नावे पार्टनर असणाऱ्या दोन पोलिसांची सखोल चौकशी करून त्यांना यात आरोपी करणे गरजेचे आहे. अशी मागणी नागरीक करत आहे.( क्रमशः)

