-
शिरूर दि. १३ ( अरुणकुमार मोटे)
अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये सामाजिक कार्यात सातत्याने भरीव योगदान देणाऱ्या रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कार्डिले यांना ‘आदर्श समाजसेविका पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. - या प्रसंगी सुप्रसिद्ध शिवशंभू व्याख्याते श्री. राकेश पिंजन सरकार यांनी “जिजाऊ तुम्ही होतात म्हणून…” या विषयावर अत्यंत प्रेरणादायी व्याख्यान सादर केले. त्यांच्या शब्दांतून राजमाता जिजाऊ साहेबांचे संस्कार, राष्ट्रनिर्मितीतील योगदान आणि मातृत्वाचे महान कार्य प्रभावीपणे उलगडले गेले. उपस्थित श्रोते भारावून गेले होते.
- कार्यक्रमात आदर्श माता, आदर्श शिक्षक व आदर्श समाजसेविका अशा विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये राणी कार्डिले यांची निवड झाल्याबद्दल उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले. महिला सक्षमीकरण, बचतगट चळवळ, गरजू महिलांना मार्गदर्शन, आरोग्य व शिक्षण विषयक उपक्रम, तसेच सामाजिक प्रश्नांवर सातत्याने काम केल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला.
-
कार्यक्रमास अखिल भारतीय मराठा महासंघाचे
तालुकाध्यक्ष शामकांत (मामा) वर्पे,
शहराध्यक्ष उमेश शेळके,
ज्योती वाळके, उर्मिला फलके, साधना शितोळे, गीता आढाव, सुवर्णा चिपाडे, अश्विनी नरवडे, शितल शर्मा, शीला पाचंगे, अंजली भाजीभाकरे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. -
पुरस्कार स्वीकारताना राणी कार्डिले म्हणाल्या,“हा सन्मान माझा नसून माझ्यासोबत काम करणाऱ्या सर्व महिलांचा आणि कार्यकर्त्यांचा आहे. अखिल भारतीय मराठा
महासंघाने दिलेला हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी असून समाजासाठी अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा देणारा आहे.” त्यांनी महासंघाचे मनःपूर्वक आभार मानले.कार्यक्रमाचा समारोप राजमाता जिजाऊ साहेबांच्या विचारांना अभिवादन करून करण्यात आला.

