जांबुत, (प्रफुल्ल बोंबे) दि. १७— शैक्षणिक वर्ष २०२५— २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये पिंपरखेड (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इयत्ता पाचवीची विद्यार्थीनी सौम्या सुनिल वरे हिची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे परिसरातून अभिनंदन करण्यात येत असुन १५ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या या परीक्षेत सौम्याने उत्तम यश संपादन करून जिल्ह्यात शाळेचा नावलौकिक वाढविला असून तिच्या या यशामागे मुख्याध्यापक पी. सी. बारहाते, वर्गशिक्षक लहू गाजरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
दरवर्षी भारत सरकारकडून घेण्यात येणाऱ्या या परीक्षेस हजारो विद्यार्थी सहभागी होऊन हि परीक्षा देत असतात. यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता सहावी ते इयत्ता बारावी पर्यंत सीबीएससी बोर्ड अभ्यासक्रमानुसार दर्जेदार मोफत शिक्षण , निवास व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. पुणे जिल्ह्यात असलेल्या पिंपळे जगताप (ता.शिरूर) येथे सौम्य पुढील शिक्षण घेणार आहे. सौम्य हिचे वडील शेती व्यवसायबरोबरच आपले सरकार सेवा केंद्र चालवत आहेत तर आई सारिका वरे या कोतवाल म्हणून कार्यरत आहेत. तिच्या या यशाबद्दल तिचे व मार्गदर्शक शिक्षकांचे ग्रामस्थाकडून सत्कार करण्यात आला .यावेळी माजी उपसरपंच रामदास ढोमे, सोसायटीचे अध्यक्ष किरण ढोमे, लक्ष्मण गायकवाड , कैलासराव बोंबे, विजय बोंबे, आबाजी पोखरकर , पंढरीनाथ वरे , देवराम ढोमे, माउली ढोमे, बाळासाहेब बोंबे, संतोष पोखरकर, अविनाश वरे , गौरेश दरेकर , सागर लोंढे, सर्जेराव उदागे यांचेसह ग्रामस्थ व शिक्षक उपस्थित होते.


