शिरूर, दि. ९ (अरुणकुमार मोटे)
शिरूर येथील श्री विवेकानंद लॉ कॉलेजमध्ये परीक्षेदरम्यान गैरप्रकार व विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप करत एका विद्यार्थ्याने शिरूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या तक्रारीत परीक्षेच्या काळात काही विद्यार्थ्यांकडून मोबाईलचा वापर करून गैरमार्गाने उत्तरं मिळविणे, तसेच परीक्षेच्या प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचे आरोप करण्यात आले आहेत.दिनांक ४ फेब्रुवारी ते ८फेब्रुवारी या दरम्यान कॉलेजमध्ये अवैधरित्या भ्रष्टाचार करत प्राध्यापक व मॅनेजमेंट स्टाफने विदयार्थ्यांकडून आर्थिक लाच घेऊन प्रथम सेमिस्टरच्या उत्तरपत्रिका परिक्षा वेळेच्या व्यतिरीक्त बोलावून लिहायला देण्यात आल्या आहे.व निकाल पूर्णपणे पक्षपात करून मॅनेज केला गेला आहे. संबंधित प्रकार प्रकार कॉलेजच्या CCTV मध्ये रेकॉर्ड देखिल आहे. याचसोबत परिक्षा चालू असतांना प्राध्यापक वरूण पवार व वर्पे मॅडम यांनी सर्व महीला विद्यार्थीनींची सर्व पुरुष विदयाथ्यांसमोर नियमबाह्य अंगतपासणी करत कॉलेजच्या मुस्लिम विदयार्थीनीला बुरखा घालव्यास अवैध परमिशन देत त्यांना अंगतपासणी (Frisking) मध्ये सूट दिली व नियमबाह्य पाँकेट रूल वापरत हिंदू विद्यार्थीनीना ओढणी काढा, जॅकेट काढा कपडे
चुकीच्या पद्धतीने उघडे करत मानहानी केली आहे. असे गंभीर आरोप तक्रारी अर्जामध्ये करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर येथील श्री विवेकानंद लॉ कॉलेजमध्ये दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत प्रथम सत्राच्या परीक्षा पार पडल्या. या परीक्षेदरम्यान काही विद्यार्थ्यांकडून मोबाईल फोनचा वापर करून बाहेरील माध्यमांतून उत्तरं मिळविण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार महाविद्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये देखील कैद झाल्याचा दावा संबंधित विद्यार्थ्याने केला आहे.
तक्रारदार नरोडे चैताली त्र्यंबक (रा. जोशीवाडी, शिरूर) यांनी पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन यांच्याकडे दिलेल्या अर्जात नमूद केले आहे की, परीक्षेदरम्यान काही विद्यार्थ्यांकडून मोबाईल फोनचा वापर करून उत्तरे मिळविणे तसेच परीक्षेच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले. या प्रकारामुळे प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे.
तक्रारीत पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, संबंधित गैरप्रकाराचा तपास करण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने परीक्षेच्या कालावधीत उपलब्ध असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासावे. दिनांक ४ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीतील संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासून करून त्याची चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय परीक्षेच्या प्रक्रियेत पारदर्शकता राहावी आणि भविष्यात अशा प्रकारचे गैरप्रकार होऊ नयेत यासाठी संबंधित विद्यार्थ्यांवर योग्य ती कारवाई करावी, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्याकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, या तक्रारीची नोंद शिरूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.या घटनेमुळे शिरूरमधील शैक्षणिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी तक्रारदार महिलेक महिलेकडून होत आहे.
दरम्यान, या तक्रारीबाबत महाविद्यालय प्रशासनाची भूमिका काय आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले असून प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण येणे बाकी आहे. पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकूणच, परीक्षेसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप समोर आल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नियमबाहय व महीलांच्या सन्मानाविरोधातील अंगतपासणी करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी तक्रारी अर्जात केली आहे.त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणे गरजेचे असल्याची भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी शिक्षण संस्थेचे विजय लगड सर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही.

