कान्हूर मेसाई, ता.०३:( सुनिल जिते )
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विकासाच्या संकल्पनेला अभिप्रेत असलेला रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गट नागरिकांची समस्या सोडवून प्रगतीपथावर आणून त्याचा कायापालट करणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार ज्योती मानसिंग पाचुंदकर यांनी दिले आहे. रांजणगाव कारेगाव मुळ जिल्हा परिषद गटात अंतर्गत रस्ते, सांडपाणी, कचरा व्यवस्थापन, जिल्हा परिषदेच्या शाळा, आरोग्य केंद्रे, तसेच सर्व सामान्य नागरिकांना व शेतकरी बंधूंना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन रांजणगाव जिल्हा परिषद गट प्रगतीपथावर आणणार असल्याचे आश्वासन सामान्य मतदार बंधू भगिनींना ज्योती पाचुंदकर यांनी दिले आहे. शिरूर आंबेगावचे भाग्यविधाते आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव कारेगाव मूळ जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ज्योती मानसिंग पाचुंदकर , पंचायत समिती गण कारेगाव-कान्हूर मेसाई राष्ट्रवादीकडून निर्मला शुभम नवले, पंचायत समिती रांजणगाव गणपती मूळ या गणातून महेश निवृत्ती फंड या तिन्ही उमेदवारांनी सामाजिक उत्तरदायित्वाची भावना वृद्धिगत करून दिवंगत नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. सामाजिक उत्तरदायित्वाची भावना वृद्धिंगत करत साध्या पद्धतीने प्रचार करून नागरिकांचे आशीर्वाद घेण्यास सुरुवात केली आहे. पुणे जिल्ह्यासाठी दिवंगत नेते अजित पवार यांनी विकास कामांसाठी भरघोस निधी असून नागरिकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा वाढू लागला असल्याचे जिल्हा परिषदेचे उमेदवार ज्योती पाचुंदकर यांनी सांगितले आहे. ग्रामीण भागातील विकास कामांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटीबद्ध असून नागरिकांचा प्रतिसाद देखील मोठ्या प्रमाणात वाढू लागला असल्याचे कारेगाव -कान्हूर मेसाई पंचायत समिती गणाचे उमेदवार निर्मला नवले यांनी सांगितले आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्गामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीनही उमेदवारांच्या बाबतीत भावनिक तसेच सहानुभूती मोठ्या प्रमाणात वाढू लागली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

