कवठे येमाई | कवठे येमाई (ता. शिरूर) येथील उस्मान शामीर पिंजारी (वय ७०) हे ज्येष्ठ नागरिक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी ( दि. ३०) घराबाहेर गेलेले उस्मान पिंजारी दोन दिवस घरी परतलेले नाहीत. घरातील कुणालाही न सांगता ते दुपारच्या सुमारास घरातून बाहेर पडल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. ते पिशवी घेऊन घराबाहेर गेले असल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रकरणी त्यांचा मुलगा अकबर पिंजारी यांनी शिरूर पोलीस ठाण्यात वडील बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार उस्मान पिंजारी यांचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.सदर व्यक्ती कोणाला आढळल्यास तात्काळ शिरूर पोलीस स्टेशन किंवा टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्राशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक फौजदार राजेंद्र चव्हाण यांनी केले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


