शिरूर दि. २० ( अरुणकुमार मोटे)
आयुष्यात कितीही संकटे आली तरी महिलांनी खचून न जाता पुन्हा धैर्याने उभे राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशनच्या संस्थापिका ॲड.राणी चोरे यांनी केले.
गोलेगाव(ता.शिरूर) येथे तेजस्विनी फाऊंडेशन यांच्या वतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की,प्रत्येक विशेष मूल हे जपताना त्या आईला प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करावा लागतो.आयुष्यात कित्येक वेळा संघर्ष करावा लागला मात्र या संघर्षात खचून न जाता उभा राहता आले. विशेष मुलांच्या पालकांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे.महिलांनी संघर्षात खचून न जाता पुन्हा संकटाचा सामना करत उभे राहायला शिकले पाहिजे असे त्या म्हणाल्या.
यावेळी उपस्थित महिलांना सामर्थ्य संस्थेकडून सॅनिटरी नॅपकिनचे ट्रेनिंग देण्यात आले.तसेच हळदी कुंकू समारंभ ही यावेळी पार पडला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली चव्हाण यांनी केले.सुमन भोगवडे यांनी सूत्रसंचालन केले.तर कुमुदिनी बोऱ्हाडे यांनी आभार मानले.यावेळी सरस्वती कटके, शैला गायकवाड, शारदा कटके, मंदाताई पवार, कुसुम धुळे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


