पारनेर तालुक्यात सर्वोच्च यश; १६९ पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण
पारनेर | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ अंतर्गत शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा डिसेंबर २०२५ मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात शालेय स्तरावर घेण्यात आली. या परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, पारनेर या विद्यालयाने १०० टक्के निकालाची उज्वल परंपरा कायम राखत पारनेर तालुक्यात सर्वोच्च निकालाची कामगिरी केली आहे.
या परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण १६९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी
४७ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी (A ग्रेड),
३७ विद्यार्थ्यांनी B ग्रेड,
तर ७९ विद्यार्थ्यांनी C ग्रेड प्राप्त करून यश संपादन केले.
या उल्लेखनीय यशामागे विद्यालयाचे कला विभागप्रमुख कलाशिक्षक श्री. ज्ञानेश्वर कवडे व कलाशिक्षिका श्रीम. कल्पना नरसाळे यांचे विद्यार्थ्यांना लाभलेले नियोजनबद्ध मार्गदर्शन व सातत्यपूर्ण मेहनत कारणीभूत ठरली आहे.
शासकीय रेखाकला परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या अंतिम गुणपत्रिकेत वाढीव गुण मिळतात.
A ग्रेडसाठी ७ गुण,
B ग्रेडसाठी ५ गुण,
तर C ग्रेडसाठी ३ गुण मिळतात. तसेच उच्च कला शिक्षणासाठी या प्रमाणपत्राचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो.
याबाबत बोलताना कला विभागप्रमुख श्री. ज्ञानेश्वर कवडे म्हणाले,
“विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढविणे, त्यांच्यातील कलागुण विकसित करणे व समाजासाठी आदर्श व्यक्तिमत्त्व घडविणे हाच या परीक्षांचा खरा उद्देश आहे.”
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे
अ.जि.म.वि.प्र. समाजाचे अध्यक्ष मा. रा. ह. दरे साहेब, सचिव मा. ॲड. विश्वासराव आठरे पाटील, जेष्ठ विश्वस्त मा. आमदार श्री. नंदकुमार झावरे पाटील, जेष्ठ विश्वस्त मा. श्री. सिताराम खिलारी, तसेच संस्थेचे सर्व विश्वस्त व सदस्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
त्याचप्रमाणे विद्यालयाचे प्राचार्य श्री. अर्जुन भुजबळ सर, उपमुख्याध्यापक श्री. नानासाहेब काळे सर, पर्यवेक्षक श्री. संतोष इंगळे सर, तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.