शिरूर (प्रतिनिधी) | शिरूर ग्रामीण–न्हावरे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ लोकनेते आर. बी. जगदाळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली न्हावरे पंचायत समिती गणातील गुणाट परिसरात भव्य होम टू होम प्रचार दौरा पार पडला.
या प्रचार दौऱ्यात जिल्हा परिषद उमेदवार वृषाली बबन वाळके व न्हावरे पंचायत समिती गणाचे उमेदवार दीपक पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
लोकनेते आर. बी. जगदाळे पाटील यांनी गावोगावी जाऊन स्थानिक ग्रामस्थांशी थेट संवाद साधत विकासात्मक प्रश्नांची माहिती घेतली. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची गरज असल्याची भूमिका त्यांनी प्रभावीपणे मांडली. त्यांच्या विचारांना ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वागत केले.
प्रचार दौऱ्यानंतर प्रतिनिधींशी बोलताना आर. बी. जगदाळे पाटील म्हणाले, “या निवडणुकीत मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संपूर्ण जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसला पोषक वातावरण आहे. उच्चशिक्षित व विकासाभिमुख उमेदवार वृषाली वाळके आणि दीपक पवार यांच्या प्रचारासाठी युवक जोमाने काम करत असून विजय निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसचाच होईल.”
या दौऱ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला अधिक बळ मिळाले असून संपूर्ण गटात सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.


